Sai Lokur Pregnant : बिग बॉस फेम सई लोकूर होणार आई; लिप लॉक करत दिली गुड न्यूज
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री सई लोकूरनं चाहत्यांना सरप्राइज दिलं आहे. अभिनेत्री लवकरच आई होणार आहे. सईनं थेट प्रेग्नंसी टेस्टचे फोटो शेअर केलेत.
advertisement
1/8

बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनची स्पर्धक अभिनेत्री सई लोकूरनं चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. सईची प्रेग्नंसी टेस्ट पॉझिटिव्ह आलीये.
advertisement
2/8
सई लवकरच आई होणार असून नुकतीच तिनं ही बातमी तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. नवरा तिर्थदीप रॉय बरोबरचे फोटो शेअर करत सईनं चाहत्यांना सरप्राइज दिलंय.
advertisement
3/8
30 नोव्हेंबर 2020 रोजी सईने तिर्थदीप रॉयबरोबर लग्न केलं. अस्सल महाराष्ट्रीय पद्धतीनं दोघांचं लग्न झालं होतं.
advertisement
4/8
लग्नाच्या जवळपास 3 वर्षांनी सई आणि तिर्थदीप यांनी मोठा निर्णय घेत आई -वडील होण्याचं ठरवलं.
advertisement
5/8
पॉझिटिव्ह प्रेग्नंसी टेस्ट तिर्थदीपला दाखवत सईनं त्यालाही सरप्राइज दिलं आहे. फोटोमध्ये दोघांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद दिसत आहे.
advertisement
6/8
"दहा चिमुकली बोटं. प्रेम आणि कृपेने आमचं कुटुंब वाढत आहे. आमच्या आयुष्यातील आनंद आणखी वाढत आहे हे तुम्हाला कळवण्यास आम्हाला अत्यंत आनंद होतं आहे. आमचं आयुष्य तुमच्या प्रेमाने आणि आनंदाने आणखी उजळून येवो", अशी पोस्ट लिहित सईनं चाहत्यांना तिची गुड न्यूज शेअर केली आहे.
advertisement
7/8
सईनं नवरा तिर्थदीपबरोबर लिपलॉक करत असतानाचा रोमँटिक फोटो देखील शेअर केला आहे.
advertisement
8/8
सईची गुड न्यूज कळल्यानंतर चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sai Lokur Pregnant : बिग बॉस फेम सई लोकूर होणार आई; लिप लॉक करत दिली गुड न्यूज