लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, ही अभिनेत्री टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमध्येमध्ये तिनं काम केलं आहे. तिनं मद्यधुंद अवस्थेत निष्काळजीपणे गाडी चालवून दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली आहे. ही घटना वर्सोवा परिसरात 8 सप्टेंबर रोजी घडली आहे. या घटनेत दोघे जण जखमी झाले असून वर्सोवा पोलिसांनी संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
( फुटपाथवर झोपला, दारुच्या व्यसनाने झाला उद्ध्वस्त; प्रसिद्ध डायरेक्टरला बायकोनेच काढलं घराबाहेर )
कुठे घडली घटना?
ही घटना अंधेरी पश्चिमच्या जेपी रोड परिसरात घडली आहे. रूची गुजर असं महिला अभिनेत्रीचं नाव असून ती फक्त 28 वर्षांची आहे. या महिलेने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे कार चालवत समीर सय्यद नावाच्या 30 वर्षीय स्कुटी चालकाला धडक दिली. यामध्ये समीर आणि त्याच्यासोबत दुचाकीवर बसलेला त्याचा 25 वर्षीय मित्र भरतकुमार गुप्ता हे दोघेही जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रुची गुजर हिची ब्रेथ अनालायझरने तपासणी केली. या तपासणीत अभिनेत्रीनं मद्यसेवन केल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर तिच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
रुची ही टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री आहे. आतापर्यंत तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती अंधेरी पश्चिम येथील लष्करीया ग्रीन हाइट्स ठिकाणी राहते, अशी माहिती तिने पोलिसांना दिली आहे.