TRENDING:

2 आठवडे घातला राडा आता सगळ्यांवर आली रडण्याची वेळ; BBहाऊसमध्ये आज नेमकं काय घडणार?

Last Updated:
bigg boss marathi 5 episode updates : दोन आठवडे घरात राडा घालणाऱ्या सदस्यांवर अचानक रडायची वेळ का आली? नेमकं आजच्या भागात काय घडणार पाहूयात.
advertisement
1/8
2 आठवडे घातला राडा आता आली रडण्याची वेळ; BBहाऊसमध्ये आज नेमकं काय घडणार?
बिग बॉस मराठीच्या घरातील तिसरा आठवडा आता सुरू होणार आहे. या आठवड्यात घरातील सगळ्यांचे खरे चेहरे समोर आले आहेत.
advertisement
2/8
2 आठवडे सगळ्या सदस्यांनी घरात तुफान धिंगाणा घातला. मात्र आठवड्याच्या शेवटी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहायला मिळालं. नुसतं पाणी नाही सगळे स्पर्धक ढसाढसा रडताना दिसणार आहेत.
advertisement
3/8
टास्कमध्ये घरातील सदस्य एकमेकांच्या अंगावर धावून गेले, आरडा-ओरडा, गोंधळ, अपमान सगळं झालं पण आजच्या भागात घरात अश्रूंचा महापूर येणार आहे.
advertisement
4/8
बिग बॉसनी सदस्यांबरोबर असा एक खेळ खेळणार आहेत की ज्यामुळे सगळ्यांवर ढसाढसा रडायची वेळ येणार आहे.
advertisement
5/8
भावनांच्या खेळात भावशून्य झालेले घरातील सगळे सदस्य त्यांच्या घरच्यांसोबत फोनवर बोलणार आहेत. हे संभाषण भावनिक झालेलं पाहायला मिळणार आहे.
advertisement
6/8
प्रोमोमध्ये पाहायवा मिळतंय की, घरच्यांना फोन लावताच सगळे सदस्य ढसाढसा रडताना दिसून येत आहेत.
advertisement
7/8
नेहमी एकमेकांत भिडणारे सदस्य आपल्या माणसांकडे मनातील भावना व्यक्त करताना दिसणार आहेत.
advertisement
8/8
गोलीगत सूरज त्याच्या दिवंगत आईला फोन लावणार आहे. सूरजचा त्याच्या आईबरोबरचा संवाद ऐकून प्रेक्षकांचेही डोळे पाणावलेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
2 आठवडे घातला राडा आता सगळ्यांवर आली रडण्याची वेळ; BBहाऊसमध्ये आज नेमकं काय घडणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल