TRENDING:

6 वेळा मिस्टर इंडिया, 5 वेळा मिस्टर महाराष्ट्र; बिग बॉसचा 'वाइल्ड कार्ड' संग्राम चौगुले आहे तरी कोण?

Last Updated:
BBM 5 card entry bodybuilder sangram chougule : मराठी बिग बॉसच्या घरातील समीकरणं आता बदलणार आहेत कारण घरात पहिल्या वाइल्ड कार्ड सदस्याची एंट्री झाली आहे. संग्राम चौगुलेने वाइल्ड कार्ड म्हणून एंट्री घेतली आहे. संग्रामच्या एंट्रीनंतर घरातील सगळ्यांचे धाबे दणाणले आहेत. संग्राम अरबाजला टफ फाइट देताना दिसणार आहे. पण हा संग्राम चौघुले आहे तरी कोण?
advertisement
1/7
'BBM5 :वाइल्ड कार्ड' एंट्रीने सगळ्यांचे धाबे दणाणले,संग्राम चौगुले  आहे तरी कोण?
संग्राम चौगुले हा सोशल मीडियावरील प्रसिद्ध चेहरा आहे. संग्राम बॉडी बिल्डर क्षेत्रात सक्रीय असून अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर तो सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे.
advertisement
2/7
कोल्हापूरचा हा रांगडा गडी स्वत:च्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेत त्यानं आजवर अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.
advertisement
3/7
संग्राम चौघुलेनं तब्बल सहा वेळा मिस्टर इंडिया आणि पाच वेळा मिस्टर महाराष्ट्र हा किताब पटकवला आहे.
advertisement
4/7
संग्राम चौघुलेनं 'महाराष्ट्र इंटर कॉलेज कॉम्पटीशन' मध्ये सहभाग घेत 'मराठा श्री' होण्याचा बहुमान देखील मिळवला आहे.
advertisement
5/7
फिटनेस क्षेत्रात तो मोलाची कामगिरी करत आहे. त्यांची स्वत:ची आलिशान जीम असून अनेक तरूणांना तो फिटनेस ट्रेलिंग देतो.
advertisement
6/7
बॉडी बिल्डर संग्राम चौगुले सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय आहे. दीड मिलियनहून अधिक लोक त्याला फॉलो करतात.
advertisement
7/7
जीम इंडस्ट्रीतील अनेक टिप्स तो सोशल मीडियावर देत असतो. त्याचा भलामोठा चाहता वर्ग असून बिग बॉसमध्ये विजेता होण्यासाठी त्याला सपोर्ट करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
6 वेळा मिस्टर इंडिया, 5 वेळा मिस्टर महाराष्ट्र; बिग बॉसचा 'वाइल्ड कार्ड' संग्राम चौगुले आहे तरी कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल