TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : मला तुम्ही सांगायची गरज नाही! या सदस्याने आता रितेश भाऊशीही हुज्जत घातली

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Bhaucha Dhakka : बिग बॉस मराठी 6 च्या घरात सदस्यांचा वाद आता नेहमीचा झाला आहे. आता मात्र एका सदस्याने भाऊचा धक्कावर रितेश देशमुखशी हुज्जत घातली. भाऊंनी चांगलंच झापलं.
advertisement
1/5
BBM 6 : मला तुम्ही सांगायची गरज नाही! या सदस्याने आता रितेश भाऊशीही हुज्जत घातली
बिग बॉस म्हणजे घरातील सदस्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद, भांडणं. बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये तुम्ही आतापर्यंत सदस्यांना एकमेकांशी भांडताना पाहिलं आहे. घरात टोळी आणि ग्रुप अशा दोन टिम होत्या. ज्या एकमेकांच्या विरोधात होत्या. पण अगदी टोळीतील सदस्यही आपसात भांडताना दिसले. पण आता तर हद्दच झाली.
advertisement
2/5
घरातील एका सदस्याने घरातील सदस्य सोड आता चक्क रितेश देशमुख याच्याशीश हुज्जत घातली आहे. बिग बॉस मराठी 6 भाऊचा धक्काचा नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात हा सदस्य रितेशशी हुज्जत घालताना दिसला आहे. हा सदस्य आहे प्राजक्ता शुक्रे.
advertisement
3/5
रितेश बोलतो, "या घरात आता नवीन सुरू झालं आहे गँगअप. हे सगळं प्रभू यांच्यासोबत केलं तुम्ही. गार्डनमध्ये ते शांत बसले होते, काहीच करत नव्हते. पण प्राजक्ता तुम्हाला असं वाटलं की प्रभू काहीतरी ऐकत आहेत आणि मग तुम्हाला एक टोमणा मारायचा होता. जा जा आत जाऊन सांग इथं काय ऐकलंस ते"
advertisement
4/5
यावर प्राजक्ता म्हणते, "आधी केलं आहे त्याने तसं भाऊ, आधी त्याची सवय राहिली आहे. तुम्ही सगळ्यांना विचारा सगळे हात वर करतील या गोष्टीवर"
advertisement
5/5
प्राजक्ताच्या अशा बोलण्याने रितेशला राग येतो. तो भडकतो आणि प्राजक्ताला चांगलंच झापतो. "मी बिग बॉस पाहतो. मला कुणाला विचारायचं आहे, तुम्ही सांगायची गरज नाही. नाहीतर इथं या माझं काम करा तुम्ही", असं तो सांगतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : मला तुम्ही सांगायची गरज नाही! या सदस्याने आता रितेश भाऊशीही हुज्जत घातली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल