पैठणमध्ये मध्यरात्री गोंधळ! डान्स बारसमोर गोळीबार अन् गाव झालं जमा; गेट तोडून आत घुसलेल्या जमावाचा राडा
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Mohan Najan
Last Updated:
रस्त्याने पायी जाणाऱ्या रजापूर येथील एका तरुणाला किरकोळ कारणावरून मद्यधुंद तरुणांनी बेदम मारहाण केली. त्याचवेळी त्यांच्या सोबत असलेल्या एका व्यक्तीने हवेत गोळीबार केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
advertisement
1/5

छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील थापटी तांडा येथे असलेल्या ‘कुलस्वामिनी कला केंद्रा’समोर शनिवारी रात्री सुमारे 11 वाजताच्या सुमारास मद्याच्या नशेत असलेल्या काही व्यक्तींनी घातलेल्या गोंधळामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. रस्त्याने पायी जाणाऱ्या रजापूर येथील एका तरुणाला किरकोळ कारणावरून मद्यधुंद तरुणांनी बेदम मारहाण केली. त्याचवेळी त्यांच्या सोबत असलेल्या एका व्यक्तीने हवेत गोळीबार केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
advertisement
2/5
घटनेची माहिती गावात पोहोचताच रजापूर येथील सुमारे 300 ग्रामस्थांचा संतप्त जमाव कला केंद्रासमोर जमा झाला. जमावाने केंद्राचा मुख्य लोखंडी गेट तोडून आत प्रवेश केला आणि तेथील फर्निचर, सीसीटीव्ही कॅमेरे, टेबल तसेच अन्य विद्युत साहित्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली.
advertisement
3/5
यावेळी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अंदाजे 10 ते 12 चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. या दगडफेकीत 3 ते 4 जण जखमी झाल्याची माहिती आहे. अचानक उसळलेल्या या गोंधळामुळे नृत्य कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये एकच धांदल उडाली. दरम्यान, पाचोड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या रजापूर परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.
advertisement
4/5
अचानक उसळलेल्या दगडफेकीमुळे कला केंद्रात क्षणात गोंधळ माजला. बाहेरून आलेल्या काही शौकिनांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली, तर काहींना संतप्त जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच केंद्रातील नृत्यांगनांनी कार्यक्रम तत्काळ थांबवला आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले. त्यांच्या या सतर्कतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे.
advertisement
5/5
सदर कला केंद्र अनधिकृतपणे सुरू असून ते कायमस्वरूपी बंद करावे, अशी मागणी आडूळ परिसरातील सुमारे वीस गावांतील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार केली आहे. मंत्रालयापर्यंत निवेदने देऊनही कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत होती. अखेर त्याच संतापातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. हल्ल्यानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून उशिरापर्यंत पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
पैठणमध्ये मध्यरात्री गोंधळ! डान्स बारसमोर गोळीबार अन् गाव झालं जमा; गेट तोडून आत घुसलेल्या जमावाचा राडा