TRENDING:

होलिका दहनावर ग्रहणाचं सावट, अग्नीमध्ये नेमकं काय अर्पण करावं? 'या' 6 वस्तू अर्पण कराच!

Last Updated:
2 मार्च 2026 रोजी देशभरात होलिका दहन साजरे केले जाणार आहे. हा सण केवळ लाकडे जाळण्याचा उत्सव नसून, वाईटावर चांगल्याच्या विजयाचा आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश करण्याचा दिवस आहे.
advertisement
1/7
होलिका दहनावर ग्रहणाचं सावट, अग्नीमध्ये नेमकं काय अर्पण करावं?
2 मार्च 2026 रोजी देशभरात होलिका दहन साजरे केले जाणार आहे. हा सण केवळ लाकडे जाळण्याचा उत्सव नसून, वाईटावर चांगल्याच्या विजयाचा आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश करण्याचा दिवस आहे. यंदाच्या होळीवर चंद्रग्रहणाचे सावट असल्याने, होळीच्या अग्नीत योग्य वस्तू अर्पण करणे अधिक फलदायी मानले जात आहे. वास्तुशास्त्र आणि परंपरेनुसार, होलिका दहनाच्या अग्नीत काही विशिष्ट वस्तू अर्पण केल्याने घरातील दारिद्र्य दूर होते आणि सुख-समृद्धीचे आगमन होते.
advertisement
2/7
नारळ: होळीच्या अग्नीत नारळ अर्पण करणे सर्वात शुभ मानले जाते. नारळ हे समृद्धीचे प्रतीक आहे. नारळ अर्पण केल्याने घरातील आर्थिक अडथळे दूर होतात आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो. काही ठिकाणी नारळ होळीभोवती ओवाळून अग्नीत टाकण्याची प्रथा आहे.
advertisement
3/7
नवीन पिकाची कणसे: पारंपारिकपणे, नवीन गव्हाची किंवा जवारीची कणसे होळीत भाजली जातात. ही समृद्धीची आणि अन्नाची कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत आहे. भाजलेली कणसे 'प्रसाद' म्हणून ग्रहण केल्याने वर्षभर आरोग्य चांगले राहते, अशी श्रद्धा आहे.
advertisement
4/7
शेणाच्या गोवऱ्या: होळी पेटवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर आवर्जून केला जातो. गाईच्या शेणात शुद्धीकरण करण्याची शक्ती असते. गोवऱ्यांच्या धुरामुळे वातावरणातील जंतू आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
advertisement
5/7
लवंग आणि कापूर: जर तुमच्या आयुष्यात विनाकारण अडचणी येत असतील, तर लवंग आणि कापूर होळीत टाकावे. यामुळे नजर दोष आणि तंत्र-मंत्राचा प्रभाव दूर होतो. कपुर हा मनःशांतीचे प्रतीक असून तो मानसिक क्लेश जाळून टाकतो.
advertisement
6/7
पिवळी मोहरी आणि काळे तीळ: आरोग्य समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पिवळी मोहरी आणि काळे तीळ अग्नीत अर्पण करावेत. यामुळे शनी, राहू आणि केतू यांसारख्या क्रूर ग्रहांचा पीडा कमी होते आणि दीर्घ आजारातून सुटका मिळण्यास मदत होते.
advertisement
7/7
विड्याची पाने आणि सुपारी: कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीसाठी विड्याची 7 पाने होळीत अर्पण करावीत. प्रत्येक प्रदक्षिणेवेळी एक पान अर्पण केल्याने घरातील सदस्यांचे रखडलेले विवाह किंवा नोकरीतील प्रश्न सुटतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
होलिका दहनावर ग्रहणाचं सावट, अग्नीमध्ये नेमकं काय अर्पण करावं? 'या' 6 वस्तू अर्पण कराच!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल