हेच ते Bigg Boss Marathi 6 च्या घरातील 3 Wild Card सदस्य; राखीचीही हवा टाईट
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Wild Card Entry : बिग बॉस मराठी 6 च्या घरात अखेर दुसऱ्यांदा वाइल्ड कार्ड एंट्री झाली आहे. ज्यात घरातलील सदस्यांवर ट्रिपल ट्रबल आलेला आहे.
advertisement
1/7

बिग बॉस मराठी 6 च्या घरात अखेर दुसऱ्यांदा वाइल्ड कार्ड एंट्री होते आहे. यावेळी एक नाही दोन नाही तर एकाच वेळी 3 वाइल्ड कार्ड एंट्री आहेत. या सदस्यांची झलकही दाखवण्यात आली आहे.
advertisement
2/7
भाऊच्या धक्क्याचा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. ज्यात वाइल्ड कार्डच्या 3 सदस्यांची एंट्री दाखवली आहे. ट्रिपल एंट्री, ट्रिपल मनोरंजन, घरातील सदस्यांवर ट्रिपल ट्रबल! असं कॅप्शन या पोस्टला देण्यात आलं आहे.
advertisement
3/7
3 वाइल्ड कार्ड एंट्रीमध्ये 2 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. एका सदस्याचा आवाजाही येऊ ऐकतो. Hi Guys असं म्हणत ती घरात एंटर करते.
advertisement
4/7
3 वाइल्ड कार्ड एंट्री ऐकताच आधीच घरातील सगळे सदस्य हादरतात आणि या तिघांना पाहताच शॉक झालेले दिसतात. अगदी सगळ्यांना पुरून उरणाऱ्या राखीचीही हवा टाईट झालेली दिसते.
advertisement
5/7
आता हे 3 सदस्य नेमके आहेत कोण? याची उत्सुकता सगळ्यांना आहे. याबाबत गेल्या बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चाही होते आहे, काही पोस्ट करण्यात आल्या आहेत. त्यानुसार काही नावं समोर आली आहेत.
advertisement
6/7
माहितीनुसार रेवा कौरसे, संस्कृती साळुंखे आणि संकेत पाठक हे आहेत. संकेत पाठक हा मराठी टीव्हीचा लोकप्रिया चेहरा आहे. लग्नाची बेडी, छत्रीवाली या मालिकेत त्याने काम केलं आहे.
advertisement
7/7
तर रेवा कौरसे दिवानियतसारख्या हिंदी मालिकेत काम केलं आहे. संस्कृती साळुंखेने याआधी हिंदी आणि मराठी रिअॅलिटी शो केले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
हेच ते Bigg Boss Marathi 6 च्या घरातील 3 Wild Card सदस्य; राखीचीही हवा टाईट