TRENDING:

'लोक पैसे मागायला यायचे अन् पप्पा...', अख्ख्या देशाला हसवणाऱ्या करण सोनावणेने सांगितला आयुष्यातला 'तो' कठीण काळ

Last Updated:
Karan Sonawane Bigg Boss Marathi 6: सोशल मीडियावर ज्याच्या एका रीलवर लाखो लोक खळखळून हसतात, तोच करण सोनावणे सध्या बिग बॉस मराठी ६ च्या घरात आपल्या आयुष्यातील सर्वात भावनिक गोष्टी उलगडतोय.
advertisement
1/8
अख्ख्या देशाला हसवणाऱ्या करण सोनावणेने सांगितला आयुष्यातला 'तो' कठीण काळ
रीलमध्ये हसवणारा हा करण प्रत्यक्षात मात्र एका मोठ्या मानसिक धक्क्यातून सावरला आहे. आयुष्यात पैशाची किंमत काय असते, हे सांगताना करणने त्याच्या संघर्षाचे असे काही प्रसंग सांगितले की, ऐकणाऱ्यांच्याही काळजाचा ठोका चुकला असेल.
advertisement
2/8
रीलमध्ये हसवणारा हा करण प्रत्यक्षात मात्र एका मोठ्या मानसिक धक्क्यातून सावरला आहे. आयुष्यात पैशाची किंमत काय असते, हे सांगताना करणने त्याच्या संघर्षाचे असे काही प्रसंग सांगितले की, ऐकणाऱ्यांच्याही काळजाचा ठोका चुकला असेल.
advertisement
3/8
बिग बॉसच्या घरात दीपाली सय्यद, आयुष संजीव आणि ओमकार राऊत यांच्याशी गप्पा मारताना करणने त्याच्या बालपणीच्या कटू आठवणींना वाट मोकळी करून दिली. तो म्हणाला, "लोक म्हणतात की पैशाने आनंद विकत घेता येत नाही, पण मला हे पटत नाही. पैशाने नक्कीच आनंद विकत घेता येतो, फक्त तो तुम्हाला घेता आला पाहिजे."
advertisement
4/8
करणने त्याच्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला, जो त्याच्या मनावर आजही कोरलेला आहे. तो म्हणाला, "माझ्या डोक्यात तो काळ अजूनही ताजा आहे. घरात पैशांची चणचण असायची. कर्ज फिटलेलं नसल्याने लोक घरी पैसे मागायला यायचे. तेव्हा दारावर माणसं आली की माझे पप्पा घाबरून लपायचे. पप्पा लपलेत हे मला कळायचं, पण का लपलेत हे तेव्हा कळायचं नाही."
advertisement
5/8
४० वर्षे बँकेत प्रामाणिकपणे नोकरी करणाऱ्या माणसाला केवळ आर्थिक समस्यांमुळे स्वतःच्याच घरात लपून राहावं लागलं, ही सल करणच्या मनात घर करून बसली होती. म्हणूनच, आपल्या मुलाला भविष्यात कधीही कशाचीही कमतरता भासू नये, ही जिद्द घेऊन तो कामाला लागला.
advertisement
6/8
संघर्षाच्या अंधारातून बाहेर पडल्यानंतर करणने स्वतःची ओळख निर्माण केली आणि आज तो आपल्या आई-वडिलांचे एकेक स्वप्न पूर्ण करतोय. नुकताच तो आपल्या आई-बाबांना दुबईला घेऊन गेला होता.
advertisement
7/8
करण म्हणाला, "मी त्यांना बुर्ज खलिफा दाखवला, तिथे त्यांच्यासाठी खास खोली घेतली. इतकंच नाही, तर त्यांना 'स्काय डायव्हिंग'चं सरप्राईज दिलं. ४० वर्षं एका चौकटीत काम करणाऱ्या बाबांसाठी आणि आईसाठी आकाशातून झेप घेण्याचा तो अनुभव अविस्मरणीय होता. मला त्यांना इतका जग फिरवायचं आहे की, शेवटी त्यांनीच म्हटलं पाहिजे, बस आता, खूप फिरलो!"
advertisement
8/8
मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या करणने आज जे स्थान मिळवलंय, त्यामागे त्याची मेहनत आणि आई-वडिलांचे कष्ट आहेत. बिग बॉसच्या घरात करणचा हा प्रवास पाहून प्रेक्षकांनीही त्याचं कौतुक केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'लोक पैसे मागायला यायचे अन् पप्पा...', अख्ख्या देशाला हसवणाऱ्या करण सोनावणेने सांगितला आयुष्यातला 'तो' कठीण काळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल