TRENDING:

BBM 6 Elimination : ज्याला समजत होते विनर तोच गेला घराबाहेर, बिग बॉस मराठीमधून 2 स्पर्धक आऊट; लव्ह स्टोरी राहिली अर्धवट

Last Updated:
BBM 6 Elimination : बिग बॉस मराठी 6 च्या घरातून या आठवड्यात दोन स्पर्धक आऊट झाले आहेत. दोन्ही स्पर्धकांचं बाहेर जाणं प्रेक्षकांसाठी शॉकिंग ठरलं आहे.
advertisement
1/11
ज्याला समजत होते विनर तोच गेला घराबाहेर, बिग बॉस मराठीमधून 2 स्पर्धक आऊट
टेलिव्हिजनचा सगळ्यात कॉन्ट्रोवर्सल शो म्हणजेच बिग बॉस.  मराठी बिग बॉसच्या 6 व्या सीजनमध्ये यावेळी प्रेक्षकांना मोठा धक्का बसणार आहे.
advertisement
2/11
या आठवड्यात पार पडलेल्या एलिमिनेशनमध्ये एक नाही तर तब्बल दोन सदस्यांना घराबाहेर पडावं लागलं. ज्याला सगळे पहिल्यापासून विजेता म्हणून पाहत होते त्याला घराबाहेर यावं लागलं आहे.
advertisement
3/11
तर दुसरीकडे सोशल मीडियावर तूफान फॅन फॉलोविंग असूनही एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला घर सोडावं लागलं आहे.
advertisement
4/11
बिग बॉस मराठी 6 च्या घरातून अभिनेता आयुष संजीव शोमधून बाहेर पडला आहे. दरम्यान त्याच्या एक्झिट संदर्भात पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. कलर्स मराठी वाहिनीकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 
advertisement
5/11
या एलिमिनेशनमधील सर्वात मोठा धक्का म्हणजे आयुष संजीवची एक्झिट. घरातील टास्कमध्ये त्याची कामगिरी सातत्याने चांगली होती. शांत स्वभाव, स्ट्रॅटेजी आणि प्रामाणिक खेळ यामुळे तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.
advertisement
6/11
आयुष संजीव अनेकांना तो या सीजनचा विजेता वाटत होता. त्यामुळे ज्याच्याकडे विनर म्हणून पाहिलं जात होतं रण तोच अचानक घराबाहेर गेल्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला.
advertisement
7/11
आयुष मागील आठवड्यात घरात फार दिसला नव्हता. त्याचं जुनं दुखणं बळावल्याने त्याला विश्रांती घेण्यास सांगितलं गेलं होतं. कदाचित प्रकृतीच्या कारणामुळे देखील आयुष घरातून बाहेर पडला असावा असा अंदाज चाहते लावत आहेत.
advertisement
8/11
दुसरीकडे बाहेर फोकस इंडिया या नावाने प्रसिद्ध असलेला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर करण सोनावणे देखील घराबाहेर आला आहे. करण घरातील रंगत वाढवणारा सदस्य मानला जात होता. त्याचा मोकळा स्वभाव, विनोदबुद्धी आणि इतर स्पर्धकांसोबतची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत होती. टास्कमध्येही तो सक्रिय असायचा.
advertisement
9/11
सोनावणे वहिनी म्हणजेच करण सोनावणेची दरम्यान त्याची आणि प्राजक्ता शुक्रेची मैत्री विशेष चर्चेत होती.
advertisement
10/11
सुरुवातीला साधी मैत्री म्हणून सुरू झालेलं नातं हळूहळू अधिक घट्ट होत गेलं. दोघेही एकमेकांशी मनमोकळं बोलताना दिसत होते. त्यांच्या नात्यात प्रेमाची चाहूल लागल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली होती. मात्र करणच्या एलिमिनेशनमुळे ही लव्ह स्टोरी अर्धवटच राहिली.
advertisement
11/11
या डबल एलिमिनेशननंतर घरातील समीकरणं पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. मजबूत मानले जाणारे स्पर्धक बाहेर पडू लागल्यामुळे उरलेल्या सदस्यांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे. प्रेक्षकांसाठीही हा सीजन अधिक अनपेक्षित वळणं घेणारा ठरत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
BBM 6 Elimination : ज्याला समजत होते विनर तोच गेला घराबाहेर, बिग बॉस मराठीमधून 2 स्पर्धक आऊट; लव्ह स्टोरी राहिली अर्धवट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल