TRENDING:

Prabhu Shelke: 8 वर्षांपासून मृत्यूशी झुंज, दर महिन्याला बदलावं लागतं रक्त! 'काळू डॉन'ला झालाय जीवघेणा आजार, उपचारही अशक्य

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Prabhu Shelke: प्रभूने सांगितलं की, त्याला दर महिन्याला रुग्णालयात जाऊन आपलं रक्त बदलावं लागतं. जर रक्त बदललं नाही, तर त्याचं शरीर साथ देत नाही.
advertisement
1/7
8 वर्षांपासून मृत्यूशी झुंज, दर महिन्याला बदलावं लागतं रक्त! प्रभूला काय झालंय?
मुंबई : जालन्याच्या मातीतला एक मुलगा, ज्याचे सोशल मीडियावर तब्बल २.३ मिलियन चाहते आहेत, ज्याच्या एका डायलॉगवर लाखो लाईक्सचा पाऊस पडतो, तोच 'छोटा डॉन' आज बिग बॉसच्या आलिशान महालात पोहोचला आहे.
advertisement
2/7
पण या झगमगाटामागे किती काळोख दडलेला आहे, हे जेव्हा त्याने पहिल्याच भागात उघड केलं, तेव्हा अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला. हा छोटा डॉन म्हणजे प्रभू शेळके, ज्याचा संघर्ष पाहून इतर स्पर्धकांच्या डोळ्यांतही पाणी आलं.
advertisement
3/7
प्रभू शेळके केवळ प्रसिद्धीसाठी बिग बॉसच्या घरात आलेला नाही, तर तो आपल्या अस्तित्वाची लढाई लढतोय. प्रभूला गेल्या आठ वर्षांपासून 'थॅलेसेमिया' या अतिशय गंभीर आजाराने ग्रासले आहे.
advertisement
4/7
या आजारात शरीरातील रक्तपेशी नष्ट होतात. प्रभूने सांगितलं की, त्याला दर महिन्याला रुग्णालयात जाऊन आपलं रक्त बदलावं लागतं. जर रक्त बदललं नाही, तर त्याचं शरीर साथ देत नाही. इतकंच नाही, तर त्याचा एक हातही निकामी झाला असून तो मोडलेला आहे.
advertisement
5/7
जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वलखेड या छोट्याशा गावातून आलेल्या प्रभूची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. प्रभूचा हा जीवघेणा आजार आणि त्याच्या उपचारांचा अफाट खर्च पेलण्यासाठी त्याच्या वडिलांना स्वतःची शेती विकावी लागली.
advertisement
6/7
आज तो इतका लोकप्रिय असला तरी त्याचं कुटुंब अजूनही साध्या पत्र्याच्या घरात राहतं. आपल्या कुटुंबाला या गरिबीतून बाहेर काढण्यासाठी आणि स्वतःचा आजार बरा करण्यासाठी तो या स्पर्धेत उतरला आहे.
advertisement
7/7
बिग बॉसच्या पहिल्याच दिवशी घरात शिरल्यावर विशाल कोटियनने प्रभूला उचलून घेतलं. ही मस्करी प्रभूच्या जिव्हारी लागली. प्रभूला बाथरुममध्ये रडू कोसळलं. तिथे त्याने आपल्या देवीआईला साद घालत म्हटलं, "माझी देवीआई प्लीज मला साथ दे. मला माहिती आहे तू माझ्या पाठीशी राहणार आहेस. तू माझी माय आहेस. दर महिन्याला रक्त बदलावं लागतं. हा आजार बरा करण्यासाठी मी इथे आलो आहे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prabhu Shelke: 8 वर्षांपासून मृत्यूशी झुंज, दर महिन्याला बदलावं लागतं रक्त! 'काळू डॉन'ला झालाय जीवघेणा आजार, उपचारही अशक्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल