Bigg Boss Marathi 6 च्या घरात संकट! सगळ्या सदस्यांना भरली धडकी, नेमकं काय घडलं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 च्या घरात पहिल्यांदाच असं संकट आलं आहे की, घरातील सगळे सदस्य आता घाबरले आहेत. सगळ्यांची हवा टाइट झाली आहे.
advertisement
1/7

बिग बॉस मराठी 6 च्या घरातील दिवस आठवडे जसजसे वाढत आहेत, तसतसं घरातील गेम, टास्क अधिकच कठीण होत चालला आहे.
advertisement
2/7
बिग बॉस मराठी 6 च्या नवीन एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे, ज्यात बिग बॉस मराठीच्या घरात येणार नवा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे. बिग बॉस मराठीच्य घरात मोठं संकट येत आहे. ज्यामुळे घरातील सगळ्या सदस्यांना धडकी भरली आहे.
advertisement
3/7
बिग बॉस मराठी 6 च्या नवीन एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे, ज्याला बिग बॉस मराठीच्या घरात येणार नवा ट्विस्ट, खिडकी उघडणार... धडकी भरणार! असं कॅप्शन देण्यात आलं आहे.
advertisement
4/7
प्रोमोमध्ये बिग बॉस सांगतात. आजवर अनेक दारं उघडली पण आता उघडणार आहेत खिडक्या. या खिडकीमागून कधी येईल संकट, कधी येतील आव्हानं, तर कधी येतील पाहुणे. खिडकी उघडणार धडकी भरणार.
advertisement
5/7
बिग बॉसच्या घरातील खिडक्या उघडणार असल्याने आता घरातील सगळ्या सदस्यांना टेन्शन आलं आहे. सगळ्यांच्या चेहऱ्याचा रंग उडालेला दिसतो आहे. राकेशची अरे देवा तर सागरची काय? अशी प्रतिक्रिया पाहायला मिळते. राखी तर शेवटी मोठ्याने ओरडताना दिसते.
advertisement
6/7
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमधील सगळ्यात मोठा ट्विस्ट. आता फक्त दार नाही तर खिडक्याही उघडणार आहेत. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातील खिडक्या उघडल्यानंतर आता नेमकं घरात काय घडणार, कोणतं संकट, कोणतं वादळ येणार हे पाहण्याची उत्सुकता आता प्रेक्षकांनाही लागून राहिली आहे.
advertisement
7/7
बिग बॉस मराठीतील या नव्या ट्विस्टमुळे घरातील सदस्यांचं टेन्शन वाढलं असलं तरी आता प्रेक्षकांना मात्र नवीन काहीतरी पाहायला मिळणार हे नक्की.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 च्या घरात संकट! सगळ्या सदस्यांना भरली धडकी, नेमकं काय घडलं?