TRENDING:

Oscar : 'ऑस्कर'मध्ये इतिहास रचणारी हॉरर फिल्म, OTT वरही तिची 'दहशत', कोणती आहे पाहा

Last Updated:
Oscar Horror Film On OTT : 98 व्या ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यात इतिहास रचणारी ही हॉरर फिल्म, जी तुम्ही ओटीटीवरही पाहू शकता.
advertisement
1/7
'ऑस्कर'मध्ये इतिहास रचणारी हॉरर फिल्म, OTT वरही तिची 'दहशत', कोणती आहे पाहा
98 व्या ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यात एका हॉरर फिल्मने रेकॉर्ड केला आहे. या फिल्मला ऑस्करमध्ये सर्वाधिक नामांकनं मिळण्याचा विक्रम आहे. या चित्रपटाने ऑल अबाउट इव्ह (1950), टायटॅनिक (1997) आणि ला ला लँड (2016) या फिल्म्सचा याआधीचा 14 नामांकनांचा रेकॉर्ड मोडला आहे.
advertisement
2/7
या चित्रपटाला 16 श्रेणींमध्ये नामांकनं मिळाली आहेत, जी आतापर्यंतची सर्वाधिक आहे. यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता यांचा समावेश आहे. त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासह चार नामांकने मिळाली.
advertisement
3/7
2025 साली रिलीज झालेली ही फिल्म फिल्मची स्टोरी जुळ्या भावांची आहे. फिल्ममध्ये 1932 मध्येय मिसिसिपीमध्ये घडलेल्या घटनेबाबत सांगण्यात आलं आहे.
advertisement
4/7
हे भाऊ पहिल्या महायुद्धात सैनिक असतात. नंतर ते शिकागोहून परततात आणि एका जुन्या जागेवर ज्यूक जॉइंट उघडण्याचा प्रयत्न करतात. पण त्यात एक काळी शक्ती अडथळा आणते आणि त्यांना त्यांचा जीव वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
advertisement
5/7
आपला जीव वाचवून हे भाऊ त्यांच्या मिसिसिपी गावी परततात आणि पुन्हा नव्याने आयुष्याला सुरुवात करतात. पण तिथंही दुष्ट शक्ती त्यांचा पिच्छा सोडत नाही. आणखी एक दुसरी मोठी दुष्ट शक्ती त्यांची तिथं वाट पाहत असते.
advertisement
6/7
रायन कूगलर यांनीच फिल्मची स्टोरी लिहिली आहे, त्याचं दिग्दर्शन आणि निर्मितीही त्यांनी केली आहे.  या चित्रपटात मायकेल बी. जॉर्डन जुळ्या गुन्हेगार भावांच्या दुहेरी भूमिकेत आहे. तर हेली स्टाइनफेल्ड, मायल्स कॅटन, जॅक ओ'कॉनेल, वुन्मी मोसाकू, जेमी लॉसन, ओमर बेन्सन मिलर आणि डेलरॉय लिंडो यांच्याही भूमिका आहेत.
advertisement
7/7
आता ही फिल्म कोणती? ती पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. ही फिल्म ओटीटीवर आहे, तुम्ही तिथं पाहू शकता. फिल्मचं नाव आहे सीनर्स, जी जिओ हॉस्टस्टारवर उपलब्ध आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Oscar : 'ऑस्कर'मध्ये इतिहास रचणारी हॉरर फिल्म, OTT वरही तिची 'दहशत', कोणती आहे पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल