TRENDING:

टोळी फुटली, काटा-बाल्कनी ग्रुपही झाले! आता Bigg Boss Marathi 6 च्या घरात नवी सीक्रेट टीम, कोण आहे यात?

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Group : बिग बॉस मराठी 6 च्या घरात टोळी, काटा, बाल्कनी ग्रुपनंतर आता आणखी एक सीक्रेट ग्रुप तयार होतो आहे.
advertisement
1/7
टोळी फुटली, 'काटा-बाल्कनी' झाली! आता 'बिग बॉस'च्या घरात सीक्रेट ग्रुप, यात कोण?
'बिग बॉस मराठी 6' च्या घरात सुरुवातीला दोन गट पाहायला मिळाले, टोळी आणि ग्रुप. नंतर ग्रुपला काटा नाव देण्यात आलं. यानंतर बाल्कनीत बसणाऱ्या सदस्यांच्या ग्रुपला बाल्कनी ग्रुप असं नाव देण्यात आलं आणि बिग बॉसच्या घरात 3 ग्रुप तयार झाले. आता बिग बॉसच्या घरात चौथा नवीन ग्रुप तयार होतो आहे.
advertisement
2/7
सध्या वाइल्ड कार्ड स्पर्धकांच्या एन्ट्रीमुळे घरातील वातावरण पूर्णपणे बदललं आहे. रविवारी 'भाऊचा धक्का'वर रेवा कौरासे, संकेत पाठक आणि संस्कृती साळुंके या तीन वाइल्ड कार्ड सदस्यांनी धडाक्यात एन्ट्री घेतली. या नवीन सदस्यांच्या येण्याने घरातील जुन्या सदस्यांची समीकरणं बदलताना दिसत आहेत.
advertisement
3/7
विशेषतः प्राजक्ता आणि नवीन वाइल्ड कार्ड स्पर्धक रेवा कौरासे यांच्यातील संवाद घरातील बदललेल्या समीकरणाबाबत चर्चेचा विषय ठरत आहेत.
advertisement
4/7
प्राजक्ताचं म्हणणं आहे, "मी तुझी चावी घेतली तुला वाईट वाटलं, पण त्यात तुझी देखील चूक आहे" त्यावर रेवा सांगते, "मला कुठलाही ग्रुप जॉईन नाही करायचा आहे. पण आपण याला ग्रुपचं नाव न देता आणि कोणासमोर रिवील न करता एक काम करू शकतो एकेमकांसोबत उभं राहूया बस्सं
advertisement
5/7
प्राजक्ताने त्यावर रेवाला विचारते, तू अशी व्यक्ती आहेस ना, जे बोलशील तेच करशील? की तू अनप्रेडिक्टेबल आहेस? त्यावर रेवा "मी जे पण कारेन ते बोलून करेन", असं सांगते.
advertisement
6/7
एकदंर काय तर बिग बॉसच्या घरात हा एक सीक्रेट ग्रुप तयार होतो आहे, ज्याला काही नाव नाही आणि तो कुणाला दिसणार नाही. या ग्रुपमध्ये प्राजक्ता, रेवा आणि संकेत यांचा समावेश आहे.
advertisement
7/7
आता बिग बॉसच्या घरातील हा नवा ग्रुप तयार होणार की बनता बनतार राहून जाणार हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
टोळी फुटली, काटा-बाल्कनी ग्रुपही झाले! आता Bigg Boss Marathi 6 च्या घरात नवी सीक्रेट टीम, कोण आहे यात?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल