राखीनंतर बिचुकले नाही तर दुसरंच कुणीतरी! Bigg Boss Marathi 6 मधील Wild Card Entry, 2 नवे चेहरे
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 मध्ये राखी सावंतनंतर आणखी एका वाइल्ड कार्ड एंट्रीची प्रतीक्षा सगळ्यांना आहे. ज्याची चर्चा सोशल मीडियावर होते आहे. त्यांची नावंही समोर येत आहेत.
advertisement
1/6

बिग बॉस मराठी 6 मध्ये राखी सावंत वाइल्ड कार्ड एंट्री झाल्यानंतर प्रेक्षकांना शो पाहायला मजा येऊ लागली आहे. आता दुसऱ्या वाइल्ड कार्ड एंट्रीचीही प्रतीक्षा सगळ्यांना आहेत. गेल्या काही दिवसांपासून याची चर्चा होते आहे. अभिजीत बिचुकलेंचं नाव घेतलं जात होतं, जे आधीही बिग बॉसमध्येही दिसले आहेत. पण आता राखीनंतर बिचुकले नाही तर दुसरंच कुणीतरी येत असल्याचं समोर आलं आहे.
advertisement
2/6
बिग बॉस मराठी 6 मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून नवीन चेहरा दिसण्याची शक्यता आहे. दोन जणांच्या नावांची सोशल मीडियावर चर्चा होते आहे. या दोघांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरूनही हा अंदाज बांधला जातो आहे. आता हे दोन नवीन चेहरे कोण आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.
advertisement
3/6
यातील एक आहे रेवा कौरासे आणि दुसरी आहे संस्कृती साळुंखे. दोघींनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर काहीतरी नवीन करणार आहे, नवीन प्रवास, बिग स्क्रिन, अशा आशयाच्या स्टोरी पोस्ट केल्या आहेत. तसंच अनेकांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
advertisement
4/6

5/6
टेलीचक्करच्या रिपोर्टनुसार रेवा कौरासे बिग बॉस मराठी 6 मधील दुसरी वाइल्ड कार्ड एंट्री आहे. तर रेडिटवर संस्कृती साळुंखेच्या नावाची चर्चा आहे.
advertisement
6/6
रेवा कौरासे ही अभिनेत्री आहे. दिवानियत आणि प्यार का पहला अध्याय : शिवशक्ती या मालिकेत काम केलं आहे. तर संस्कृती साळुंखे की ही 'जाऊ बाई गावात' या मराठी आणि 'डार्क शो : मुकाबला अंजान से' या हिंदी रिअॅलिटी शोमध्ये दिसली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
राखीनंतर बिचुकले नाही तर दुसरंच कुणीतरी! Bigg Boss Marathi 6 मधील Wild Card Entry, 2 नवे चेहरे