TRENDING:

Rinku Rajguru Education : सगळ्या इंग्रजीत सांगू का म्हणणारी आर्ची खऱ्या आयुष्यात किती शिकलीये? रिंकूचं शिक्षण किती?

Last Updated:
Rinku Rajguru Education : मराठी सांगितलेलं कळत नाही इंग्रजीत सांगू म्हणणाऱ्या रिंकू राजगुरूचं शिक्षण किती झालंय? कोणत्या विषयात शिकलीये रिंकू?
advertisement
1/8
सगळ्या इंग्रजीत सांगू का म्हणणारी आर्ची खऱ्या आयुष्यात किती शिकलीये?
'मराठीत सांगितलेलं कळत नाही इंग्रजीत सांगू…' असा दमदार डायलॉग मारणारी आर्ची आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सैराट या सिनेमामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू.
advertisement
2/8
पडद्यावर आत्मविश्वासाने इंग्रजी बोलण्याची तयारी दाखवणारी आर्ची खऱ्या आयुष्यात किती शिकली आहे याची उत्सुकता अनेकांना आहे.
advertisement
3/8
रिंकूने 'सैराट'चं शूटींग केलं तेव्हा ती नववीत शिकत होती. एवढ्या लहान वयात तिला मुख्य भूमिकेची संधी मिळाली. सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा ती दहावीत होती. त्या काळात तिचा दहावीचा निकाल प्रचंड चर्चेत आला होता. अभिनय आणि शिक्षण यांचा समतोल राखत तिने चांगले गुण मिळवले होते.
advertisement
4/8
यानंतर तिचा बारावीचा निकालही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. स्टारडमच्या झोतात असूनही तिने शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं नाही.
advertisement
5/8
रिंकूचं खरं नाव प्रेरणा आशा महादेव राजगुरू आहे. तिचा जन्म 3 जून 2001 रोजी महाराष्ट्रातील अकलूज येथे झाला. तिचे वडील महादेव राजगुरू आणि आई आशा राजगुरू आहेत. साध्या कुटुंबातून आलेल्या रिंकूने आपल्या मेहनतीच्या जोरावर मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण केली.
advertisement
6/8
रिंकूने तेंभुर्णी येथील जाई तुळजाभवानी आर्ट्स अँड सायन्स ज्युनिअर आश्रम कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केलं. ग्रामीण भागातील शाळेतून शिकलेली ही मुलगी आज राष्ट्रीय पातळीवर ओळखली जाते हीच तिच्या प्रवासाची खासियत आहे.
advertisement
7/8
‘सैराट’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर रिंकू एका रात्रीत स्टार झाली. तिच्या अभिनयाचं सर्व स्तरांतून कौतुक झालं. या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आलं. त्यानंतर तिने मराठीबरोबरच हिंदी सिनेमांतही काम केलं.
advertisement
8/8
त्यानंतर तिनं कागर, झुंड सारख्या सिनेमात काम केलं. अलीकडच्या काळात रिंकू वेबसीरिज आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांत सक्रिय आहे. रिंकूचा आशा हा सिनेमा अलिकडेच रिलीज झाला. पुन्हा एकदा साडे माडे तीन या सिनेमातही रिंकू प्रमुख भूमिकेत होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru Education : सगळ्या इंग्रजीत सांगू का म्हणणारी आर्ची खऱ्या आयुष्यात किती शिकलीये? रिंकूचं शिक्षण किती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल