Bigg Boss Marathi 6 : दिपालीने विशालला रितेशसमोरच 'कुटलं'; 'त्या' गोष्टीचा 'भाऊचा धक्का'वर घेतला 'बदला'
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Bhaucha Dhakka : बिग बॉस मराठी 6 च्या भाऊचा धक्क्यावर दिपालीने विशालवरील कॅप्टन्सी उमेदवारीच्या खेळावरील राग बाहेर काढला आहे.
advertisement
1/7

बिग बॉस मराठी 6 मध्ये यावेळी कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी मध गोळ्या करण्याचा टास्क देण्यात आला होता. यावेळी विशालने दीपाली आणि रेवाला अडवून धरलं होतं. याचा वचपा दिपालीने 'भाऊचा धक्का'वर काढला आहे.
advertisement
2/7
कॅप्टन्सी उमेदवारीच्या टास्कवेळी दोन टिमला मध गोळा करायचं होतं. जी टिम जास्त मध गोळा करेल, त्या टिमच्या सदस्यांना कॅप्टन्सीची उमेदवारी मिळेल आणि त्यांच्यापैकी एक कॅप्टन होईल. एका फुलाला नळ लावलं होतं, त्यातून मधे मधे मध येत होतं. तेव्हा टिमला ते गोळा करायचं होतं.
advertisement
3/7
दिपाली आणि रेवा एका टिममध्ये होत्या तर विशाल त्यांच्या विरोधातील टिममध्ये होत्या. दिपाली आणि रेवा मध गोळा करत असताना विशालने त्या दोघींना अडवलं. तोपर्यंत विशालच्या टिममधील संस्कृती मध गोळा करायला आली.
advertisement
4/7
विशालने रेवा आणि दिपाली घट्ट धरून ठेवलं होतं. इतकं की त्यांना त्रास होत होता. रेवा विशालला आपल्याला सोडण्याची विनंती करत होती. पण विशाल काही ऐकला नाही.
advertisement
5/7
हाच राग कुठेतरी दिपालीच्या मनात होता आणि तिने तो भाऊचा धक्कावर नॉमिनेशन टास्कवेळी काढला आहे. नॉमिनेशनसाठी दिपाली विशालचं नाव घेते. ती म्हणजे, "ज्या पद्धतीने तो खेळत होता, तिला लागेल, नाही लागेल याचा काही विचारच करत नव्हता"
advertisement
6/7
विशाल आपली बाजू मांडतो. तो मी हे जाणूनबाजून नाही केलं असं सांगतो. यावर दिपाली स्वीकारणंही महत्त्वाचं आहे, असं म्हणते. यावर विशाल "मला माहिती नाही असं थेट सांगून टाकतो आणि आता काय करू, घर सोडून जाऊ का?" असं विचारतो.
advertisement
7/7
यानंतर दिपाली रागात त्याचा फोटो कुटते. यावेळी सदस्यांचा फोटो कुटून त्यांना नॉमिनेट करायचं आहे आणि दिपाली विशालला नॉमिनेट करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : दिपालीने विशालला रितेशसमोरच 'कुटलं'; 'त्या' गोष्टीचा 'भाऊचा धक्का'वर घेतला 'बदला'