TRENDING:

वकिलांच्या ड्रेसकोडबाबत मोठा निर्णय, 3 महिने काळ्या कोटाला सुट्टी, नेमकं कारण काय?

Last Updated:

Advocate Coat: काही वेळा ड्रेसकोड न पाळल्यास न्यायाधीशांनी वकिलांना सुनावल्याची उदाहरणेही समोर आली आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : उन्हाळ्याच्या दिवसांत वाढते तापमान आणि कडक उन्हामुळे सगळेच हैराण होतात. या काळात अनेकजण काळ्या रंगाचे कपडे टाळतात. कारण काळा रंग सूर्यप्रकाश अधिक शोषून घेतो आणि उष्णता वाढवतो. मात्र न्यायालयीन कामकाजात पक्षकारांची बाजू मांडणाऱ्या वकिलांसाठी काळा कोट हा केवळ पोशाख नसून त्यांच्या पेशाची ओळख मानली जाते. त्यामुळे उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यातही बहुतांश वकील काळा कोट घालूनच न्यायालयात हजर राहतात.
वकिलांच्या ड्रेसकोडबाबत मोठा निर्णय, 3 महिने काळ्या कोटाला सुट्टी, नेमकं कारण काय?
वकिलांच्या ड्रेसकोडबाबत मोठा निर्णय, 3 महिने काळ्या कोटाला सुट्टी, नेमकं कारण काय?
advertisement

वकिलांना उन्हाळ्यात कोटामुळे होणारा त्रास लक्षात घेऊन दरवर्षी 15 मार्च ते 15 जून या कालावधीत काळा कोट न घालण्याची मुभा देण्यात येते. या निर्णयामुळे विशेषतः ग्रामीण भागातील वकिलांना काही प्रमाणात दिलासा मिळतो. अनेक तालुका आणि जिल्हा न्यायालयांमध्ये पंखे, कुलर किंवा पुरेशी वायुवीजन व्यवस्था नसल्याने वकिलांना कोट घालून काम करणे कठीण होते. अशा परिस्थितीत ही सवलत त्यांच्यासाठी उपयोगी ठरते.

advertisement

Massajog Sarpanch: मस्साजोगचा नवा कारभारी कोण? संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पोटनिवडणूक जाहीर

प्रत्यक्षात शहरातील अनेक न्यायालयांमध्ये वकिलांची वेगळीच भावना पाहायला मिळते. कोट न घातल्यास आपण अपूर्ण असल्यासारखे वाटते, अशी भावना अनेक वकिलांनी व्यक्त केली आहे. न्यायालयीन वातावरणात आपली ओळख, शिस्त आणि व्यावसायिकता जपण्यासाठी कोट महत्त्वाचा असल्याचे ते सांगतात. शिवाय न्यायाधीशांसमोर बाजू मांडताना ड्रेसकोडचे पालन केले आहे की नाही, याकडे विशेष लक्ष दिले जाते. काही वेळा ड्रेसकोड न पाळल्यास न्यायाधीशांनी वकिलांना सुनावल्याची उदाहरणेही समोर आली आहेत. त्यामुळे वकिलांमध्ये ड्रेसकोडबाबत विशेष जागरूकता दिसून येते.

advertisement

View More

कोटाशिवाय वकिली अशी कल्पनाही आम्ही करू शकत नाही. कोट घातल्यावरच वकील म्हणून परिपूर्ण असल्याची भावना येते. त्यामुळे उन्हाळ्यातही अनेक वकील कोट घालण्याला प्राधान्य देतात. मात्र ज्या ठिकाणी तापमान जास्त असते किंवा वीजपुरवठ्याच्या अडचणी असतात, अशा ग्रामीण भागातील वकिलांना या निर्णयाचा मोठा फायदा होतो.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: द्राक्षं, केळीचं मार्केट हाललं; कांदा, लिंबूला शनिवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

एकंदरीत, नियमाने मुभा असली तरी परंपरा, सवय आणि व्यावसायिक ओळख यामुळे उन्हाळ्यातही वकिलांचा काळा कोट न्यायालयात कायम दिसून येत आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
वकिलांच्या ड्रेसकोडबाबत मोठा निर्णय, 3 महिने काळ्या कोटाला सुट्टी, नेमकं कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल