TRENDING:

Bigg Boss: कितीबी येणार, तरी सरांना नाय म्हणायचं नाही! गुलीगत सूरजनं सांगितला पुढचा प्लॅन

Last Updated:
Suraj Chavan Interview: बिग बॉस मराठीचा कोणताच सीजन गाजला नसेल तेवढं जबरदस्त प्रेम प्रेक्षकांनी 'बिग बॉस मराठी सीजन 5'ला दिलं. बिग बॉस न बघणारेही हा सीजन आवर्जून फॉलो करत होते. कारण यंदा केवळ अभियन क्षेत्रातून नाही, तर विविध क्षेत्रातील कलाकारांनी खेळात सहभाग घेतला होता. त्यातून बाजी मारली ती सर्वसामान्य घरातून आलेल्या आणि सोशल मीडियावर फेमस झालेल्या सूरज चव्हाण यानं. (निकिता तिवारी, प्रतिनिधी / मुंबई)
advertisement
1/5
कितीबी येणार, तरी सरांना नाय म्हणायचं नाही! गुलीगत सूरजनं सांगितला पुढचा प्लॅन
सूरज बिग बॉसच्या खेळात सहभागी होण्यापूर्वी सोशल मीडियावर फेमस होताच, परंतु घरात आल्यावर प्रेक्षकांना त्याचा स्वभाव, साधेपणा विशेष आवडला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो टास्कही जमेल तसं जीव लावून खेळायचा. शारीरिकदृष्ट्या घरातला सर्वात ताकदवान सदस्य मानल्या जाणाऱ्या अरबाज पटेललाही सूरजनं एका टास्कमध्ये घाम फोडला होता.
advertisement
2/5
सर्वात महत्त्वाचं म्हणजे 'मीच ट्रॉफी उचलणार' असं सूरज सुरुवातीपासून म्हणायचा. हाच त्याचा आत्मविश्वास भारी होता. तो जिंकल्यावर देश-विदेशातील त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. परंतु सूरज काही खेळलाच नाही आणि शो जिंकला असं म्हणणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. परंतु सूरज घरात शांत असायचा हे खरंय, मात्र जिथं बोलायचंय तिथं तो बरोबर बोलायचा, त्याच्या मित्रांची साथ द्यायचा, टास्कही व्यवस्थित खेळायचा. म्हणूनच त्याला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं.
advertisement
3/5
प्रेक्षकांकडून सूरजसाठी भरभरून वोटिंग सुरू होतंच, शिवाय भाऊच्या धक्क्यावर येणाऱ्या प्रत्येक कलाकाराकडून त्याचं कौतुक व्हायचं. फिनालेमध्ये दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरजचा एक चित्रपट काढणार, अशी घोषणाच केली. त्यात हिरो सूरजच असणार आहे.
advertisement
4/5
बिग बॉसचा खेळ जिंकल्यानंतर 'लोकल 18'नं सूरजची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली. त्यात त्यानं याबाबत प्रचंड आनंद व्यक्त केला. 'आता या चित्रपटाशिवाय तुझ्याकडे इतरही प्रोजेक्ट येतील, आता पुढे काय करायचं याबाबत तुझं काय प्लॅनिंग आहे', असं सूरजला विचारलं.
advertisement
5/5
प्रश्नाचं उत्तर देताना सूरज म्हणाला, 'मला सरांनी पिक्चर दिलाय. आता दुसरे कितीबी येणार तरी सरांना नाय म्हणायचं नाही. मला 1 पिक्चर दिलाय सरांनी, दुसरे आता कितीबी येणार पण त्यांना नाय म्हणायचं, नायच म्हणायचं. एवढ्या मोठ्या माणसानी आपल्याला संधी दिली. त्यांनी इथपर्यंत आणलंय आणि त्यांचाच पिक्चर हाय, माझ्याच डायलॉगनी बनतोय. तर मी त्यांना माझं अप्पा मानलंय, माझं वडील आहेत ते.'
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss: कितीबी येणार, तरी सरांना नाय म्हणायचं नाही! गुलीगत सूरजनं सांगितला पुढचा प्लॅन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल