TRENDING:

दलदली हरियर अन् पेंटेड स्टॉर्क, छ. संभाजीनगरमध्ये 54 पक्षी प्रजातींची नोंद, पाहा खास PHOTOS

Last Updated:
इबर्डवरील नोंदीनुसार एकूण 54 प्रजातींच्या स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांची यशस्वी नोंद करण्यात आली.
advertisement
1/7
दलदली हरियर अन् पेंटेड स्टॉर्क, संभाजीनगरमध्ये 54 पक्षी प्रजातींची नोंद, PHOTOS
निसर्ग मित्र मंडळ, छत्रपती संभाजीनगर आणि महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सुखना मध्यम प्रकल्प जलाशय परिसरात पक्षी सप्ताह साजरा करण्यात आला. पक्षीमित्र किशोर गठडी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या पक्षीनिरीक्षण उपक्रमात शहरातील नागरिक, विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींनी उत्साहाने सहभाग घेतला. इबर्डवरील नोंदीनुसार एकूण 54 प्रजातींच्या स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांची यशस्वी नोंद करण्यात आली.
advertisement
2/7
यामध्ये ब्लॅक विंग्ड स्टिल्ट (शेकाट्या), युरेशियन कूट, रिव्हर टर्न (नदी सुरय), इंडियन स्पॉट-बिल्ड डक (ठिपक्याचे बदक), एशियन ओपनबिल (उघड्या चोचीचा करकोचा), पेंटेड स्टॉर्क (रंगीत करकोचा) आणि ग्लॉसी आयबिस (चमकदार करकोचा) पाणपक्ष्यांचा समावेश होता. तसेच वेस्टर्न मार्श-हॅरियर आणि पाईड किंगफिशर यांचीही नोंद झाली.
advertisement
3/7
दलदली हरियर, खडखडी खंड्या, पांढऱ्या छातीचा खंड्या, पोपट, लालबुड्या बुलबुल, घरचिमणी इत्यादी या मध्ये होते. वुड सॅन्डपाईपर (तुतारी) हा पक्षी प्रामुख्याने उत्तर युरोपात आणि उत्तर आशियातील उप-आर्क्टिक पाणथळ प्रदेशात आणि टुंड्रा भागात प्रजनन करतो. प्रजनन झाल्यावर हे पक्षी थंडीच्या काळात आफ्रिका आणि दक्षिण आशियात स्थलांतर करतात. दक्षिण आशिया हे त्यांचे प्रमुख हिवाळी निवासस्थान आहे. महाराष्ट्रातील आगमन ऑक्टोबरमध्ये होते.
advertisement
4/7
ओपनबिल स्टॉर्क हा उघड्या चोचीचा बगळा आहे. हा भारतीय उपखंडाचा स्थानिक रहिवासी पक्षी आहे. त्यामुळे तो लांब पल्ल्याचे स्थलांतर करत नाही तर स्थानिक हालचाल करतो. भारत, श्रीलंका आणि आग्नेय आशिया हा या पक्ष्यांचा मूळ आणि कायमस्वरूपी निवासस्थान असलेला प्रदेश आहे. महाराष्ट्रातील ओपनबिल स्टॉर्क हे बहुतेकदा उत्तर भारत किंवा जवळच्या राज्यांमधून प्रजननासाठी प्रवास करतात.
advertisement
5/7
सैबेरियन बुश चाट हा पक्षी प्रामुख्याने समशीतोष्ण आशियामध्ये प्रजनन करतो. हा पूर्वेकडील युरोप ते कॅस्पियन समुद्रापर्यंत पसरलेल्या प्रदेशात आढळतो. उत्तर गोलार्धातील थंडी टाळण्यासाठी हे पक्षी दरवर्षी शरद ऋतूमध्ये दक्षिणेकडे स्थलांतर करतात. ते साधारणपणे सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यांदरम्यान आपल्याकडे येतात.
advertisement
6/7
पेंटेड स्टॉर्क (रंगीत सारस) याला मराठीत चित्रबलाक म्हणतात. हा पक्षी लांब पल्ल्याचे आंतरखंडीय स्थलांतर करत नाही. हा पक्षी भारतीय उपखंडाचा आणि आग्नेय आशियाचा स्थानिक रहिवासी आहे. त्यांचा प्रवास अनेकदा स्थानिक आणि अनियमित असतो. काही पक्षी अन्नाच्या शोधात एकाच भागात 200 किमीपर्यंतचा प्रवास करू शकतात. दक्षिण भारत आणि महाराष्ट्रात साधारणपणे ऑक्टोबर ते फेब्रुवारी/एप्रिल या काळात घरटी बांधतात.
advertisement
7/7
ब्लॅक-विंग्ड स्टिल्ट (शेकाट्या) हा पक्षी भारतात वर्षभर रहिवासी आणि स्थलांतरित असा आहे. भारतीय उपखंडात हा उन्हाळ्यात उत्तर भारत, वायव्य पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या भागातील सरोवरे आणि नद्यांच्या काठी प्रजनन करतो. हे पक्षी मध्य आशियाई फ्लाईवेने येतात. राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात पाणथळ जागांवर आश्रय घेतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
दलदली हरियर अन् पेंटेड स्टॉर्क, छ. संभाजीनगरमध्ये 54 पक्षी प्रजातींची नोंद, पाहा खास PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल