'धुरंधर' रणवीर सिंग शूटिंगवेळी सतत घ्यायचा ब्रेक आणि दीपिकाकडे पळायचा; सहअभिनेत्याने सांगितलं कारण
- Published by:Priya Lad
Last Updated:
Dhurandhar 2 Ranveer Singh : धुरंधर 2 च्या शूटिंगवेळी रणवीर सिंगचा हा किस्सा त्याचा सहअभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला आहे.
advertisement
1/7

धुरंधर 2 किंवा 'धुरंधर: द रिव्हेंज' फिल्ममुळे रणवीर सिंग सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. पण याचवेळी या फिल्मच्या शूटिंगवेळीचा त्याचा एक किस्सा त्याच्या सहअभिनेत्याने सांगितला आहे.
advertisement
2/7
धुरंधर 2 मध्ये यासिरची भूमिका साकारणारा अभिनेता अभय अरोराने नुकतीच मुलाखत दिली या मुलाखतीत त्याने रणवीर सिंगचा एक किस्सा सांगितला आहे.
advertisement
3/7
अभयने सांगितलं, "रणवीर शूटिंगच्या मधल्या वेळेत किमान तीन-चार दिवसांची सुट्टी मिळवण्याचा नेहमीच पुरेपूर प्रयत्न करायचा. जेणेकरून तो आपल्या पत्नीकडे जाऊन कुटुंबाची काळजी घेऊ शकेल"
advertisement
4/7
"शूटिंगच्या बिझी शेड्युलमध्येही रणवीर आपल्या जबाबदाऱ्या कधीच विसरला नाही. तो आपल्या प्रेग्नंट पत्नीच्या पाठीशी नेहमीच उभा होता. दीपिका पदुकोणची तो पूर्ण काळजी घ्यायचा आणि शूटिंगमधून जेव्हाही त्याला वेळ मिळायचा, तेव्हा तो तिच्याशी संपर्क साधायचा", असं अभय म्हणाला.
advertisement
5/7
"व्यावसायिक जीवनासोबतच कौटुंबिक आयुष्यही असं जपणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे", असं अभय मिर्ची प्लसला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
advertisement
6/7
धुरंधर 2 फिल्मचं शूटिंग सुरू होतं तेव्हा दीपिका प्रेग्नंट होती आणि रणवीरने बिझी असतानाही दीपिकाची काळजी कशापद्धतीने घेतली हे अभयने सांगितलं. सप्टेंबर 2024 मध्ये रणवीर आणि दीपिकाची मुलगी दुआचा जन्म झाला.
advertisement
7/7
रणवीर आणि दीपिकाने 2018 मध्ये लग्न केलं. बॉलिवूडमध्ये सगळ्यात फेमस सेलिब्रिटी कपलपैकी हे एक कपल. धुरंधर द रिव्हेंजच्या सक्सेचं सेलिब्रेशन करण्यासाठी रणवीर दीपिकासोबत लंच डेटवर गेला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'धुरंधर' रणवीर सिंग शूटिंगवेळी सतत घ्यायचा ब्रेक आणि दीपिकाकडे पळायचा; सहअभिनेत्याने सांगितलं कारण