Aishwarya Rai : पैसाच पैसा! मुंबई सोडा, दुबईपर्यंत पसरलीय ऐश्वर्या रायची प्रॉपर्टी, Net Worth पाहून चक्कर येईल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Aishwarya Rai Property : ऐश्वर्याने केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे, तर रिअल इस्टेटच्या दुनियेतही आपली पकड मजबूत केली आहे. तिच्या नावावर मुंबईपासून दुबईपर्यंत अनेक ठिकाणी शानदार प्रॉपर्टी आहेत.
advertisement
1/8

मुंबई: बॉलिवूडची 'ब्युटी क्वीन' आणि मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन केवळ तिच्या अभिनयासाठी आणि सौंदर्यासाठीच नव्हे, तर तिच्या अति-आलिशान लाइफस्टाइलसाठीही ओळखली जाते.
advertisement
2/8
ऐश्वर्याने केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे, तर रिअल इस्टेटच्या दुनियेतही आपली पकड मजबूत केली आहे. तिच्या नावावर मुंबईपासून दुबईपर्यंत अनेक ठिकाणी शानदार प्रॉपर्टी आहेत.
advertisement
3/8
सध्याच्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय बच्चन ही भारतातील दुसरी सर्वात श्रीमंत अभिनेत्री ठरली आहे. तिच्या एकूण संपत्तीचा आकडा सुमारे ९०० कोटी रुपये इतका मोठा आहे.
advertisement
4/8
ऐश्वर्याची कमाई केवळ चित्रपटांतूनच नव्हे, तर ब्रँड एंडोर्समेंटमधूनही होते. एका चित्रपटासाठी ती सुमारे १० ते १२ कोटी रुपये इतके मोठे मानधन घेते. याव्यतिरिक्त, ती ब्रँड जाहिरातींमधूनही दरवर्षी कोट्यवधी रुपये कमावते.
advertisement
5/8
ऐश्वर्या राय बच्चनची मालमत्ता केवळ भारतातच नाही, तर परदेशातही पसरलेली आहे. दुबईतील जुमेराह गोल्फ इस्टेट्स येथील सैंक्चुअरी फॉल्समध्ये तिचा एक भव्य व्हिला आहे. या आलिशान व्हिलाची किंमत सुमारे १६ कोटी रुपये इतकी आहे.
advertisement
6/8
मुंबईतही तिच्या नावावर अनेक पॉश ठिकाणी प्रॉपर्टी आहेत. वांद्रे परिसरात तिचं एक शानदार अपार्टमेंट आहे, ज्याची किंमत तब्बल ३० कोटी रुपये आहे. याशिवाय, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि वरळी येथेही तिचे लक्झरी अपार्टमेंट आहेत.
advertisement
7/8
ऐश्वर्याला केवळ घरांचीच नव्हे, तर लक्झरी गाड्यांची देखील प्रचंड आवड आहे. तिच्या कलेक्शनमध्ये अनेक महागड्या आणि दुर्मिळ गाड्यांचा समावेश आहे.
advertisement
8/8
तिच्याकडे रोल्स रॉयस फँटम, रोल्स रॉयस घोस्ट, ऑडी A8L, बेंटले कॉन्टिनेंटल जीटी, मर्सिडीज-बेंझ एस५०० आणि लेक्सस एलएक्स ५७० सारख्या कार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Aishwarya Rai : पैसाच पैसा! मुंबई सोडा, दुबईपर्यंत पसरलीय ऐश्वर्या रायची प्रॉपर्टी, Net Worth पाहून चक्कर येईल