TRENDING:

Weather Alert: कल्याण-डोंबिवली तापमानात मोठे बदल, आता नवसंकट येणार, हवामान खात्याकडून अलर्ट

Last Updated:
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि सकाळी उशिरापर्यंत हलके धुके अनुभवायला मिळेल. यावरून 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी कल्याण डोंबिवली शहरातील हवामान स्थिती काय असेल बघुयात.
advertisement
1/5
कल्याण-डोंबिवली तापमानात मोठे बदल, आता नवसंकट येणार, हवामान खात्याकडून अलर्ट
महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून चढउतार बघायला मिळत आहेत.उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील किमान तापमानात घट होऊन थंडी जोर वाढेल. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि सकाळी उशिरापर्यंत हलके धुके अनुभवायला मिळेल. यावरून 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी कल्याण डोंबिवली शहरातील हवामान स्थिती काय असेल बघुयात.
advertisement
2/5
कल्याण तालुक्यात थंडी ओसरल्याने रविवारी हवेत दमटपणा होता. आज मात्र वातावरण पुन्हा बदलून स्वच्छ आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 18 अंश सेल्सिअस ते कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस असेल,दुपारी उबदारपणा जाणवेल,हवामानातील बदलांमुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
advertisement
3/5
डोंबिवली शहरातील हवामान मुख्यतः स्वच्छ, कोरडे आणि सुखद राहण्याची शक्यता असून सकाळी काही भागात हलके धुके आणि थंडी जाणवून, तापमानात किंचित वाढ होईल. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 18 अंश सेल्सिअस असून, सकाळच्या वेळी हवामानात हलका गारठा, तर दुपारनंतर उष्णता वाढेल.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात हवामान कोरडे, सुखद आणि अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 16 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस असेल,दिवसा हवामान उबदार राहून, रात्री थंडी जाणवेल.
advertisement
5/5
बदलापूरमध्ये हवामान सुखद आणि अंशतः ढगाळ असून हलकी थंडी जाणवेल. किमान तापमान 15 अंश सेल्सिअस ते कमाल तापमान 25 अंश सेल्सिअस असेल ,शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील वाऱ्याचा वेग सौम्य असल्याने किमान तापमान 18 अंश सेल्सिअस ते कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस दिवसा उबदारपणा तर रात्री थंडी जाणवेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: कल्याण-डोंबिवली तापमानात मोठे बदल, आता नवसंकट येणार, हवामान खात्याकडून अलर्ट
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल