डेडली कॉम्बो! 'या' खास मूलांकाच्या मुली असतात सुपरलकी, असते परफेक्ट लव्ह लाईफ आणि अमाप संपत्ती
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचा मूलांक त्याचा स्वभाव, नशीब आणि भविष्याबद्दल बरेच काही सांगून जातो. ज्योतिषशास्त्रात अशा काही खास मूलांकांचा उल्लेख आहे, ज्यांच्याशी संबंधित मुली अत्यंत भाग्यवान मानल्या जातात.
advertisement
1/6

अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचा मूलांक त्याचा स्वभाव, नशीब आणि भविष्याबद्दल बरेच काही सांगून जातो. ज्योतिषशास्त्रात अशा काही खास मूलांकांचा उल्लेख आहे, ज्यांच्याशी संबंधित मुली अत्यंत भाग्यवान मानल्या जातात. विशेषतः या मूलांकांच्या मुलींच्या आयुष्यात पैसा आणि परफेक्ट लव्ह लाईफ यांचा सुवर्णसंगम पाहायला मिळतो.
advertisement
2/6
मूलांक 2: ज्या मुलींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 2 असतो. या मुली दिसायला अत्यंत आकर्षक आणि स्वभावाने हळव्या असतात. चंद्राच्या प्रभावामुळे त्यांची लव्ह लाईफ अतिशय रोमँटिक असते. त्यांना जोडीदाराकडून भरपूर प्रेम मिळते आणि लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात आर्थिक भरभराट वेगाने होते.
advertisement
3/6
मूलांक 3: 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 3 असतो. या मुलींवर देवगुरु बृहस्पतीची कृपा असते. त्या अत्यंत बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी असतात. त्यांच्याकडे पैशांचे व्यवस्थापन करण्याची उत्तम कला असते, ज्यामुळे त्या कधीही आर्थिक चणचणीत राहत नाहीत. करिअर आणि कौटुंबिक सुख या दोन्ही गोष्टी त्यांना सहज प्राप्त होतात.
advertisement
4/6
मूलांक 5: 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 5 असतो. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे या मुलींचे संवादकौशल्य अप्रतिम असते. त्या कोणत्याही परिस्थितीत स्वतःला जुळवून घेतात. व्यवसायात किंवा नोकरीत त्या खूप नाव कमावतात. त्यांच्या उत्साही स्वभावामुळे त्यांची लव्ह लाईफ नेहमी फ्रेश आणि आनंदी राहते.
advertisement
5/6
मूलांक 8: 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 8 असतो. जरी शनीचा अंक कष्टाचा मानला जात असला, तरी या मुलींना आयुष्याच्या उत्तरार्धात अफाट संपत्ती मिळते. त्या स्वभावाने गंभीर आणि एकनिष्ठ असतात. एकदा कोणाच्या प्रेमात पडल्या की, त्या आयुष्यभर साथ निभावतात. त्यांना सहसा स्थिर आणि श्रीमंत जोडीदार मिळतो.
advertisement
6/6
मूलांक 9: 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 9 असतो. या मुली अत्यंत धाडसी आणि स्वतंत्र विचारांच्या असतात. मंगळाच्या प्रभावामुळे त्या स्वतःच्या जोरावर संपत्ती निर्माण करतात. त्यांच्या लव्ह लाईफमध्ये खूप पॅशन असते. त्या आपल्या जोडीदाराचे आणि कुटुंबाचे खंबीरपणे रक्षण करतात, ज्यामुळे त्यांचे नाते मजबूत राहते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
डेडली कॉम्बो! 'या' खास मूलांकाच्या मुली असतात सुपरलकी, असते परफेक्ट लव्ह लाईफ आणि अमाप संपत्ती