TRENDING:

Guess Who : बॉलिवूडची पहिली Female Superstar कोण? घ्यायची जितेंद्र-धर्मेंद्रपेक्षा जास्त मानधन

Last Updated:
Bollywood First Female Superstar : बॉलिवूडच्या सुरुवातीच्या काळात सुपरस्टार्स म्हणून प्रामुख्याने पुरुष कलाकारांचीच ओळख होती. पण या पहिल्या महिला सुपरस्टारने फिल्म इंडस्ट्रीची दिशा बदलली. ही अभिनेत्री जितेंद्र आणि धर्मेंद्रपेक्षाही जास्त फी घेत होती.
advertisement
1/7
बॉलिवूडची पहिली Female Superstar कोण? घ्यायची जितेंद्र-धर्मेंद्रपेक्षा जास्त फी
बॉलिवूडच्या सुरुवातीच्या काळात सुपरस्टार्सच्या यादीत फक्त पुरुष कलाकार असायचे. मात्र एका अभिनेत्रीने हा ट्रेंड पूर्णपणे बदलून टाकला. ती प्रत्येक चित्रपटासाठी जितेंद्र आणि धर्मेंद्रपेक्षाही अधिक मानधन घेत असे. मोठमोठे कलाकार तिच्यासोबत काम करण्यास उत्सुक असायचे.
advertisement
2/7
श्रीदेवी यांना बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार मानले जाते. तिने केवळ अभिनयानेच नव्हे, तर आपल्या मानधनातूनही इतिहास घडवला.
advertisement
3/7
श्रीदेवीचा जन्म 1963 मध्ये झाला. लहानपणापासूनच तिने अभिनयाची सुरुवात केली. साऊथमध्ये तिने मोठं नाव कमावलं. त्यानंतर 1979 मध्ये 'सोलवा सावन' या सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण खरा धमाका 1980 च्या दशकात झाला.
advertisement
4/7
श्रीदेवीने जितेंद्रसोबत 'हिम्मतवाला' हा सिनेमा 1983 मध्ये केला. हा सिनेमा सुपरहिट ठरल. त्यांनतर श्रीदेवी आणि जितेंद्र यांनी 'तोहफा', 'मावाली', ‘सुहागन’ असे अनेक चित्रपट केले, जे सगळे ब्लॉकबस्टर ठरले.
advertisement
5/7
श्रीदेवीने आपल्या नृत्य आणि अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं. 1986 मध्ये 'नागिना' हा सिनेमा आला. त्यातील सापासोबतचे तिचे नृत्य आजही लक्षात राहिले आहे. या चित्रपटांतील दमदार अभिनय आणि भन्नाट डान्स मूव्ह्समुळे ती मोठी स्टार बनली. त्या काळात श्रीदेवी अमिताभ–धर्मेंद्रपेक्षाही पुढे निघून गेल्या होत्या.
advertisement
6/7
श्रीदेवीची खास बाब म्हणजे मानधनाचा आकडा. 1980–90 च्या दशकात जितेंद्र आणि धर्मेंद्र लाखोंमध्ये मानधन घेत असताना श्रीदेवी कोटींमध्ये फी घेत होत्या. मिडिया रिपोर्टनुसार, एका सिनेमासाठी 1 कोटी रुपये चार्ज करणारी ती पहिली अभिनेत्री होती. त्या काळातील मोठ्या नायकांपेक्षाही ही रक्कम अधिक होती. अनेक दिग्दर्शकांना तिच्या फीमुळे तिला कास्ट करणे शक्य होत नसे.
advertisement
7/7
श्रीदेवीची लोकप्रियता इतकी होती की चित्रपट फक्त तिच्या नावावर चालायचे. 'चांदनी', 'मिस्टर इंडिया', 'नागिन', ‘लम्हे’ यांसारख्या चित्रपटांनी तिला अजरामर केले. दक्षिण भारतीय सिनेमा असो वा हिंदी सिनेमा सर्वत्र ती सुपरस्टार होती. तिची बरोबरी अनेक मोठ-मोठ्या सुपरस्टार्सलाही करता आलेली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who : बॉलिवूडची पहिली Female Superstar कोण? घ्यायची जितेंद्र-धर्मेंद्रपेक्षा जास्त मानधन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल