वीकेंडला बाहेर जाण्याची गरज नाही! OTT वर रिलीज झालेत हे जबरदस्त चित्रपट आणि वेबसीरिज
- Published by:Minal Gurav
Last Updated:
शुक्रवार आला की लोक नवा सिनेमा पाहण्यासाठी थिएटरला जायचे पण आता ओटीटीवर कोणते सिनेमे किंवा सीरिज आल्या आहेत ते चेक करतात. या वीकेंडला ओटीटीवर काय पाहायचं असा विचार करताय तर ही घ्या लिस्ट.
advertisement
1/7

The Taj Story हा चित्रपट 2025 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात परेश रावल यांनी एका गाईडची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा आता OTTplay Premium वर पाहता येईल.
advertisement
2/7
Aspirants Season 3 - यी सीरिजच्या पहिल्या भागात मुखर्जी नगरमध्ये UPSC ची तयारी करणाऱ्या एका तरुणाची कथा दाखवण्यात आली होती, जो पुढे जाऊन IAS अधिकारी बनतो. मात्र आता त्याने हे पद मिळवल्यानंतर त्याच्या आयुष्यात नवे आणि मोठे आव्हान उभे राहतात. सीझन 3 मध्ये त्याच संघर्षाची पुढची कहाणी दाखवण्यात आली आहे. ही सीरिज 13 मार्च रोजी रिलीज झाली आहे. प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.
advertisement
3/7
Bharatha Mahasayulaku Vignapthi हा तेलुगू रोमँटिक ड्रामा आहे. या चित्रपटात रवी राजा आणि ऐश्वर्या राजेश यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट हैदराबादमध्ये राहणाऱ्या एका पुरुषाची कथा स्टोरी आहे. जो दोन महिलांमधील नात्यांच्या गुंत्यात अडकतो. हा चित्रपट 13 मार्च रोजी OTTplay Premium वर रिलीज झाला आहे.
advertisement
4/7
Zootopia 2 या अॅनिमेटेड चित्रपटातून Judy Hopps आणि Nick Wilde ही पात्रे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हा चित्रपट 26 नोव्हेंबर 2025 रोजी रिलीज झाला होता. आता तो JioHotstar वर तुम्ही पाहू शकता.
advertisement
5/7
Landlord हा कन्नड भाषेतील पीरियड अॅक्शन चित्रपट आहे. या चित्रपटात Duniya Vijay यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.1980 ते 1990 च्या दशकात कर्नाटकमध्ये घडलेल्या दंगलींची पार्श्वभूमी सिनेमात दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट आता ZEE5 वर पाहता येईल.
advertisement
6/7
Funky - दिग्दर्शक के पी अनुदीप यांचा फंकी हा कॉमेडी सिनेमा आहे. हा सिनेमा Netflix वर रिलीज झाला आहे. सिनेमात विश्वक सेन आणि कयाडू लोहार तेलुगू कलाकार दिसणार आहेत. हा एक म्युझिकल कॉमेडी चित्रपट असून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करेल.
advertisement
7/7
Resort ही तमिळ कॉमेडी-ड्रामा वेब सीरिज 13 मार्च ला JioHotstar वर रिलीज झाली आहे. वेत्री नावाच्या कॉलेज ड्रॉपआउट तरुणाची कथा यात दाखवली आहे. तो एका लक्झरी बीचसाइड रिसॉर्टमध्ये कुक बनण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचदरम्यान घडणाऱ्या मजेदार घटना घडतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
वीकेंडला बाहेर जाण्याची गरज नाही! OTT वर रिलीज झालेत हे जबरदस्त चित्रपट आणि वेबसीरिज