TRENDING:

बॉलिवूड हादरलं! 'धुरंधर' फेम अभिनेत्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप, लग्नाचं आमिष दाखवून मोलकरणीचं 10 वर्षं शोषण

Last Updated:
बॉलीवूडचा बहुचर्चित स्पाय थ्रिलर 'धुरंधर' सध्या बॉक्स ऑफिसवर गाजत असतानाच, या चित्रपटातील एका अभिनेत्याच्या कृत्याने सिनेसृष्टीला काळिमा फासला आहे.
advertisement
1/10
लग्नाचं आमिष दाखवून मोलकरणीवर 10 लैंगिक अत्याचार, 'धुरंधर' फेम अभिनेता अटकेत
मुंबई: बॉलीवूडचा बहुचर्चित स्पाय थ्रिलर 'धुरंधर' सध्या बॉक्स ऑफिसवर गाजत असतानाच, या चित्रपटातील एका अभिनेत्याच्या कृत्याने सिनेसृष्टीला काळिमा फासला आहे.
advertisement
2/10
'धुरंधर'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता नदीम खान याला बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. एका ४१ वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेने नदीमवर गेल्या १० वर्षांपासून लग्नाचं आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.
advertisement
3/10
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला गेल्या अनेक वर्षांपासून नदीमच्या संपर्कात होती. लग्नाचे खोटे आश्वासन देऊन नदीमने तिचे शारीरिक शोषण केले. पहिल्यांदा ही घटना मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती.
advertisement
4/10
याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी झिरो एफआयआर नोंदवून हे प्रकरण पुढील तपासासाठी मालवणी पोलिसांकडे वर्ग केले आहे. २२ जानेवारी रोजी नदीमला अटक करण्यात आली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे.
advertisement
5/10
आदित्य धर यांच्या 'धुरंधर' चित्रपटात नदीम खानने 'अहलाक' नावाच्या स्वयंपाक्याची भूमिका साकारली होती. हा अहलाक म्हणजे रहमान डकैतचा विश्वासू माणूस असतो, पण प्रत्यक्षात तो संजय दत्तने साकारलेल्या एसपी चौधरी यांच्यासाठी खबऱ्या म्हणून काम करत असतो.
advertisement
6/10
चित्रपटातील एका अंगावर काटा आणणाऱ्या दृश्यात, रणवीर सिंह (हमजा मझारी) सत्य वदवून घेण्यासाठी या अहलाकची बोटे कापताना दिसतो. शेवटी गद्दारी केल्यामुळे या पात्राची हत्या केली जाते. पडद्यावर गद्दारीची भूमिका करणाऱ्या या अभिनेत्याने खऱ्या आयुष्यातही असेच काहीसे कृत्य केल्याने प्रेक्षकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
advertisement
7/10
नदीम खान हा सिनेसृष्टीत नवखा नाही. त्याने अनेक वर्षांपासून टीव्ही, चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले आहे. त्याचे इंस्टाग्राम प्रोफाईल पाहिले तर त्याने अमिताभ बच्चन, असरानी, आदिल हुसेन आणि संजय मिश्रा यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केल्याचे दिसते.
advertisement
8/10
'मिमी', 'वध', 'धडक', 'मिसेस सिरियल किलर' आणि 'मुखबिर' या चित्रपटांमध्ये नदीमने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. नदीम हा प्रायोगिक नाटकांमध्येही सक्रिय होता आणि मुंबईतच स्थायिक आहे.
advertisement
9/10
नदीम खानचा आगामी चित्रपट 'वध २' येत्या ६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात नदीमने महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारली आहे. मात्र, या अटकेमुळे चित्रपटाच्या प्रसिद्धीवर आणि प्रदर्शनावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
advertisement
10/10
नदीम किंवा त्याच्या वकिलांनी अद्याप या आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या पोलीस अधिक तपास करत असून, या प्रकरणात अजून काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बॉलिवूड हादरलं! 'धुरंधर' फेम अभिनेत्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप, लग्नाचं आमिष दाखवून मोलकरणीचं 10 वर्षं शोषण
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल