Border 2 OTT Release : 2 आठवड्यात बजेट वसूल, थिएटर गाजवल्यानंतर 'बॉर्डर 2' ओटीटीवर, काय आहे रिलीज डेट?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Border 2 OTT Release : बॉर्डर 2 सिनेमा थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. सिनेमा ओटीटीवर कधी येणार? काय आहे बॉर्डर 2 ची ओटीटी रिलीज डेट?
advertisement
1/8

1997 साली आलेल्या 'बॉर्डर 2' या कल्ट क्लासिक सिनेमानंतर बॉर्डर 2 प्रेक्षकांच्या भेटीला आला. 2026 मध्ये 'बॉर्डर 2' हा मोस्ट अवटेड सिनेमा होता. अभिनेता सनी देओलनं पुन्हा एकदा त्याचा देशभक्तीवाला अवतार प्रेक्षकांना दाखवला. सिनेमा थिएटरमध्ये अपेक्षेप्रमाणे मजबूत कमाई करतोय.
advertisement
2/8
थिएटर गाजवल्यानंतर 'बॉर्डर 2' ओटीटीवर कधी रिलीज होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अशातच निर्मात्यांनी 'बॉर्डर 2' ची ओटीटी रिलीड डेट नुकतीच जाहीर केली आहे.
advertisement
3/8
'बॉर्डर 2' मध्ये सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी तसंच अलावा मोना सिंह, मेधा राणा आणि सोनम बाजवा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'बॉर्डर 2' 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. सनी देओलनं सिनेमात कर्नल फतेह सिंह कलेरची भूमिका साकारली आहे.
advertisement
4/8
'बॉर्डर 2' च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत बोलायचं झाल्यास, सिनेमानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी 30 कोटींची कमाई केली होती. पहिल्या आठवड्यात सिनेमानं 224.25 कोटी कमावले. तर दुसऱ्या आठवड्यात सिनेमाचं ऐकूण कलेक्शन 286 कोटींवर पोहोचलं. तिसऱ्या आठवड्यात सिनेमा 300 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करण्याची अपेक्षा आहे.
advertisement
5/8
'बॉर्डर 2' सिनेमानं अवघ्या दोन आठवड्यात 275 कोटींचं बजेट वसूल केलं. ट्रेड एनालिस्टच्या माहितीनुसार, येणाऱ्या आठवड्यात सिनेमाचं कलेक्शन असंच वाढत राहिलं तर सिनेमाचं वर्ल्ड वाइल्ड कलेक्शन हे 400 कोटींहून अधिक होऊ शकतं.
advertisement
6/8
'बॉर्डर 2' हा सिनेमा 23 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या आठवड्याच्या रिलीज झाला. सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटर हाऊसफुल केली आहेत.
advertisement
7/8
सिनेमाचे स्ट्रीमिंग राइट्स हे नेटफ्लिक्स इंडियाकडे आहेत. 'बॉर्डर 2' च्या ऑफिशिअल ओटीटी रिलीज डेट काय असणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. दरम्यान 'बॉर्डर 2' हा सिनेमा 20 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज केला जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे.
advertisement
8/8
अभिनेता सनी देओलसाठी 'बॉर्डर 2' हा सिनेमा खूप महत्त्वाचा होता. पण सिनेमाच्या रिलीजच्या काही दिवस आधी त्याचे वडिल अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं. वडिलांच्या निधनामुळे सनी देओल सिनेमाच्या प्रमोशनमध्ये फार दिसला नाही. सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याने बहिण ईशा आणि आहाना यांना स्पेशल स्क्रिनिंगसाठी आमंत्रण दिलं होतं. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल भावंड पहिल्यांदाच एकत्र दिसले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Border 2 OTT Release : 2 आठवड्यात बजेट वसूल, थिएटर गाजवल्यानंतर 'बॉर्डर 2' ओटीटीवर, काय आहे रिलीज डेट?