कोण आहे Inspector Zende मध्ये दाखवलेला बिकिनी किलर? मुलींसोबत करायचा भयंकर कृत्य
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Who is Charles Sobhraj? : २० व्या शतकातील सर्वात प्रसिद्ध सिरीयल किलर्सपैकी एक, चार्ल्स शोभराज हा त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी आणि धूर्त गुन्ह्यांसाठी ओळखला जातो.
advertisement
1/11

मुंबई: काही माणसं अशी असतात, ज्यांची कहाणी चित्रपटांपेक्षाही रंजक असते. असाच एक माणूस म्हणजे चार्ल्स शोभराज. तो 'लेडी किलर' आहे की 'बिकनी किलर' हे सांगणं कठीण आहे, पण एक गोष्ट खरी आहे की, या माणसाने सगळ्यांना वेड लावलं.
advertisement
2/11
तिहार जेलच्या भिंतीही त्याला रोखू शकल्या नाहीत. आज आम्ही तुम्हाला याच खतरनाक गुन्हेगाराची कहाणी सांगणार आहोत.
advertisement
3/11
चार्ल्सचा जन्म व्हिएतनाममध्ये १९४४ साली झाला होता. त्याचे वडील भारतीय आणि आई व्हिएतनामी होती. त्याच्या आई-वडिलांचं लग्न झालं नव्हतं आणि वडिलांनी त्याला लहानपणीच सोडून दिलं.
advertisement
4/11
त्यामुळे त्याचं बालपण खूप संघर्षात गेलं. नंतर तो फ्रान्सला गेला आणि तिथला नागरिक बनला. सुरुवातीपासूनच त्याला गुन्हेगारी आणि चालाकीने पैसे कमवण्याची सवय लागली.
advertisement
5/11
चार्ल्स शोभराज इतका प्रभावशाली होता की, तो कोणालाही पहिल्या भेटीतच आपल्या जाळ्यात अडकवायचा. गोव्यामध्ये तो जास्त सक्रिय होता आणि त्याचे टार्गेट परदेशी मुली असायच्या.
advertisement
6/11
तो त्यांना डिनरसाठी बोलावून, नशेत आणायचा आणि मग त्यांच्यावर अत्याचार करून त्यांचं किमती सामान घेऊन पळून जायचा. त्यामुळे त्याला 'बिकनी किलर' असं नाव पडलं. त्याच्यावर १५ ते २० लोकांच्या हत्या केल्याचा आरोप आहे.
advertisement
7/11
चार्ल्सला १९७६ मध्ये दिल्लीत अटक करण्यात आली. त्याला तिहार जेलमध्ये ठेवण्यात आलं, पण तिथेही त्याचा रुबाब काही कमी झाला नाही.
advertisement
8/11
त्याला सी-क्लासचे कैदी नोकर म्हणून मिळाले होते, जे त्याची मालिश करायचे, कपडे धुवायचे आणि जेवण बनवायचे. त्याची खोली एखाद्या स्टुडिओ अपार्टमेंटसारखी होती आणि जेलमध्ये त्याला ‘चार्ल्स साहेब’ असं म्हटलं जायचं.
advertisement
9/11
१९८६ मध्ये चार्ल्सने त्याचा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं. त्याने पार्टीत मिठाई वाटली आणि पोलिसांना ५० रुपयांचं आमिष दाखवलं.
advertisement
10/11
त्या मिठाईत नशा होती, ती खाऊन सगळे बेशुद्ध झाले आणि चार्ल्स हाय-सिक्युरिटी जेलमधून पळून गेला. पण, २३ दिवसांनंतर त्याला पुन्हा गोव्यामध्ये अटक झाली. अनेक देशांमध्ये त्याच्यावर हत्यांचे गुन्हे दाखल आहेत.
advertisement
11/11
२०२२ मध्ये वयामुळे त्याची सुटका करण्यात आली आणि त्याला फ्रान्सला पाठवण्यात आलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कोण आहे Inspector Zende मध्ये दाखवलेला बिकिनी किलर? मुलींसोबत करायचा भयंकर कृत्य