साऊथ इंडस्ट्रीमध्ये राधिका आपटेसोबत घडला भयंकर प्रकार, अभिनेत्रीने सेटवरच अभिनेत्याला मारली कानाखाली, असं काय झालं होतं?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
'ओटीटी क्वीन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या राधिका आपटेने प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे, मग तो साध्या महिलेचा असो वा बोल्ड सीनचा. पण एका चित्रपटाच्या सेटवर तिने एका अभिनेत्याला कानशिलात मारली होती.
advertisement
1/8

मुंबई: बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने वेगळं स्थान निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. ती तिच्या अभिनयासह बिनधास्त स्वभावासाठीही ओळखली जाते.
advertisement
2/8
'ओटीटी क्वीन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्रीने प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे, मग तो साध्या महिलेचा असो वा बोल्ड सीनचा.
advertisement
3/8
पण एका चित्रपटाच्या सेटवर तिला एका अभिनेत्याला कानशिलात मारावी लागली होती, याचा खुलासा तिने स्वतःच केला आहे, ज्यामुळे सध्या मोठी चर्चा सुरू आहे.
advertisement
4/8
राधिका आपटेने तिच्या एका जुन्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे. ती एका तामिळ चित्रपटाचं शूटिंग करत होती. त्यावेळी तिच्यासोबत एक असा अभिनेता होता, ज्याला ती ओळखतही नव्हती.
advertisement
5/8
राधिकाने सांगितलं, “एक दिवस आम्ही शूटिंग करत असताना त्या अभिनेत्याने अचानक माझ्या पायाला गुदगुल्या करायला सुरुवात केली. मी त्याला ओळखतही नव्हते आणि त्याने मला स्पर्श केला. यामुळे मला खूप राग आला आणि मी त्याला कानशिलात मारली.” राधिकाचा हा स्वभाव पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं.
advertisement
6/8
राधिकाने २००५ मध्ये शाहिद कपूरच्या 'वाह! लाईफ हो तो ऐसी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यात तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आणि आपलं टॅलेंट दाखवलं.
advertisement
7/8
'अंधाधून' मध्ये आयुष्मान खुराणासोबत, 'पॅडमॅन'मध्ये अक्षय कुमारची पत्नी म्हणून, आणि 'मांझी'मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करून तिने आपलं अभिनयाचं कौशल्य सिद्ध केलं.
advertisement
8/8
राधिकाने थिएटरपासून ते बॉलिवूडपर्यंत खूप मोठा प्रवास केला आहे. ती 'सेक्रेड गेम्स' आणि 'लस्ट स्टोरीज' सारख्या वेब सीरिजमध्ये वेगळ्या अंदाजात दिसली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
साऊथ इंडस्ट्रीमध्ये राधिका आपटेसोबत घडला भयंकर प्रकार, अभिनेत्रीने सेटवरच अभिनेत्याला मारली कानाखाली, असं काय झालं होतं?