'या आकड्यांपेक्षा...', विक्की कौशलच्या 'छावा'ने 100 कोटींची कमाई करताच संतोष जुवेकरची पोस्ट चर्चेत
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Santosh Juvekar on Chhava Collection : छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा छावा सिनेमा विकेंडला कोटींची कमाई करत हिट ठरला. सिनेमात विक्की कौशल, संतोष जुवेकर हे मराठमोळे कलाकार चमकले.
advertisement
1/7

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रम आणि शौर्याची गाथा सांगणारा छावा हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाने ओपनिंगलाच दमदार कमाई करण्यात यश मिळवलं आहे.
advertisement
2/7
अभिनेता विक्की कौशलने सिनेमात जीव ओतून काम केलं आहे. संपूर्ण सिनेमात विक्की कौशलबरोबर काही मराठी कलाकार देखील आहेत. ज्यांनी आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांची पसती मिळवली आहे.
advertisement
3/7
अभिनेता संतोष जुवेकर, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी, अभिनेत्री नीलकांती पाटेकर , किरण करमरकर अशी तगड्या मराठी कलाकारांची फौज छावा सिनेमात आपल्याला पाहायला मिळते.
advertisement
4/7
छावा सिनेमाने अवध्या तीन दिवसात 100कोटीहून अधिक कमाई करण्यात यश मिळवलं आहे. पण सिनेमाच्या या कमाईपेक्षा मला थिएटरमध्ये येणारे प्रेक्षक जास्त महत्त्वाचे वाटतात असं म्हणत अभिनेता संतोष जुवेकरने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.
advertisement
5/7
छावा सिनेमाने विकेंडला तब्बल 72.4 कोटींची कमाई केली. संतोष जुवेकर बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगत पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने लिहिलंय, "मला ह्या आकड्या पेक्षा प्रत्येक सिनेमागृहातल्या माझ्या मायबाप प्रेक्षकांचा आकडा बघायला आणि ऎकायला आवडेल."
advertisement
6/7
संतोषने पुढे लिहिलंय, "माझ्या धाकल्या धनिना बघायला आणि समजून घ्यायला येणाऱ्या माझ्या भगव्या रक्ताचा कल्लोळ झाला पाहिजे. जय भवानी जय शिवराय जय संभाजी राजे"
advertisement
7/7
अभिनेता संतोष जुवेकरने छावा सिनेमात रायाजी यांची दमदार भूमिका साकारली आहे. सिनेमातील त्याच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होतंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'या आकड्यांपेक्षा...', विक्की कौशलच्या 'छावा'ने 100 कोटींची कमाई करताच संतोष जुवेकरची पोस्ट चर्चेत