TRENDING:

Prarthana Behere: ‘माझं पहिलं मूल लग्नाआधीचं...’ अखेर प्रार्थना बेहेरेनं सोडलं मौन, खरं काय ते सांगूनच टाकलं

Last Updated:
Prarthana Behere: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘चिकी चिकी बुबूम बुम’ मुळे चर्चेत आहे. या दरम्यान तिने मूल नाही यावर मौन सोडलं आहे.
advertisement
1/7
‘माझं पहिलं मूल लग्नाआधीचं...’ अखेर प्रार्थना बेहेरेनं सोडलं मौन, खरं सांगितलं
प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आपल्या नवीन 'चिकी चिकी बुबूम बुम' चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत आहे. नुकतीच तिने 'आम्ही असं ऐकलंय' या कार्यक्रमात हजेरी लावली, जिथे तिला एक प्रश्न विचारण्यात आला. तिला 15-16 मुलं आहेत याविषयी विचारलं. तर तिने यावर उत्तर दिलं आहे.
advertisement
2/7
नुकतीच ती सुमन म्युझिक मराठीच्या ‘आम्ही असं ऐकलंय’ या शोमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिला एक मजेशीर पण आश्चर्यचकित करणारा प्रश्न विचारण्यात आला, "आम्ही असं ऐकलंय की तू 15-20 मुलांची आई आहेस आणि हे सर्वांपासून लपवून ठेवलंय? प्रार्थनानेही याचं हटके उत्तर दिलं.
advertisement
3/7
यावर हसून प्रार्थनाने सांगितलं की, "हो, हे खरं आहे! यातला माझा एक मुलगा तर लग्नाआधीचा होता. ज्याचं नाव 'गब्बर' आहे." पण गब्बर हा तिचा मुलगा नसून तिचा लाडका कुत्रा आहे. प्रार्थनाला प्राण्यांवर खूप प्रेम आहे. तिच्याकडे 7 कुत्रे आहेत आणि तिच्या फार्महाऊसवर अजून अनेक प्राणी आहेत. तिथे गायी आणि 10-12 घोडे आहेत.
advertisement
4/7
प्रार्थना सांगते की, "हे सगळेच आमची मुलं आहेत. त्यांची काळजी घेणं सोपं नसतं, पण त्यांचं प्रेम खूप मोलाचं आहे. आम्ही आता ठरवलंय की, मानव मुलं नको, हीच आमची मुलं. प्रार्थनाचे पती अभिषेक जावकर यांनाही प्राण्यांवर खूप प्रेम आहे. प्रार्थना म्हणाली, "अभिषेक प्राण्यांसाठी खूप पझेसिव्ह आहे. लहानपणापासूनच त्याला प्राण्यांची आवड आहे."
advertisement
5/7
प्रार्थना म्हणते की, "प्राण्यांनाही माणसांसारखेच प्रेम लागते. आमच्याकडे त्यांच्यासाठी कर्मचारी आहेत, पण आम्ही दोघंही त्यांच्याकडे लक्ष देतो. आमच्यासाठी ते फक्त पाळीव प्राणी नाहीत, तर आमच्या कुटुंबाचा भाग आहेत."
advertisement
6/7
प्रार्थना आणि अभिषेक यांचं लग्न 2017 मध्ये झाले. अभिषेक एक यशस्वी निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. प्रार्थना आणि अभिषेकची ओळख त्यांच्या एका मैत्रिणीने करून दिली होती. हळूहळू त्यांची मैत्री झाली आणि मग प्रेम. 14 नोव्हेंबर 2017 रोजी त्यांनी लग्न केले.
advertisement
7/7
आज प्रार्थना अभिनयासोबतच तिच्या प्राण्यांचीही काळजी घेते. ती म्हणते, "लोक विचारतात, तुला मूल नाही का हवं? मी म्हणते, माझी मुलंच खूप आहेत. आमचं घर म्हणजे माणसांचं नाही, तर प्राण्यांचं एक मोठं कुटुंब आहे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prarthana Behere: ‘माझं पहिलं मूल लग्नाआधीचं...’ अखेर प्रार्थना बेहेरेनं सोडलं मौन, खरं काय ते सांगूनच टाकलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल