TRENDING:

'मी लग्नासाठी बनलो नाही' म्हणणारा अक्षय खन्ना 'या' अभिनेत्रीसाठी होता वेडा! लग्नाची तयारीही झाली, मग कुठे माशी शिंकली?

Last Updated:
Akshaye Khanna Relationship: ५० वर्षांचा असूनही आजही अक्षय खन्ना आजही अविवाहित आहे. मात्र एक काळ असा होता, जेव्हा तो एका अभिनेत्रीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता.
advertisement
1/10
'मी लग्नासाठी बनलो नाही' म्हणणारा अक्षय खन्ना 'या' अभिनेत्रीसाठी होता वेडा!
मुंबई: सध्या अभिनेता अक्षय खन्ना त्याच्या 'धुरंधर' चित्रपटामुळे सर्वत्र चर्चेत आहे. पडद्यावर त्याचा खलनायकी अंदाज जितका गाजतोय, तितकीच त्याच्या खासगी आयुष्याची चर्चाही पुन्हा सुरू झाली आहे.
advertisement
2/10
तुम्हाला माहीत आहे का, ५० वर्षांचा असूनही आजही अक्षय खन्ना आजही अविवाहित आहे. मात्र एक काळ असा होता, जेव्हा तो एका अभिनेत्रीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता.
advertisement
3/10
अक्षय खन्ना एकेकाळी बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री करिश्मा कपूर हिच्याशी लग्न करण्याच्या तयारीत होता! अभिनय आणि सुंदरतेसाठी ओळखली जाणारी करिश्मा कपूर आणि शांत, रहस्यमय अक्षय खन्नाची ही कहाणी फिल्मी दुनियेतील एक मोठी ट्रॅजेडी मानली जाते.
advertisement
4/10
बॉलिवूड रुमर्सनुसार, अभिनेता अजय देवगनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर करिश्मा आणि अक्षय खन्ना एकमेकांच्या जवळ आले. त्यांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. सूत्रांनुसार, हे नाते इतके घट्ट झाले होते की, दोघांनी लग्न करण्याचे ठरवले होते. करिश्माचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनीही या लग्नाला होकार दिला होता.
advertisement
5/10
इतकेच काय, तर रणधीर कपूर यांनी थेट अक्षय खन्नाचे वडील विनोद खन्ना यांच्याकडे करिश्मासाठी लग्नाचा प्रस्तावही पाठवला होता! मग कुठे चुकलं?
advertisement
6/10
मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिश्माच्या आई बबिता यांनी या लग्नाला जोरदार विरोध केला. त्यामागे मोठे कारण होते की, त्यावेळी करिश्मा कपूरचे करिअर ऐन शिखरावर होते. बबिता यांना वाटत होते की, या टप्प्यावर करिश्माने लग्न करणे योग्य नाही.
advertisement
7/10
अखेरीस, आईच्या विरोधापुढे करिश्मा आणि अक्षयचे लग्न जुळू शकले नाही आणि त्यांचे नाते तुटले. विशेष म्हणजे, करिश्मा किंवा अक्षय या दोघांनीही कधीही सार्वजनिकरित्या या नात्याबद्दल भाष्य केले नाही.
advertisement
8/10
ब्रेकअपनंतरही दोघांमधील संबंधांमध्ये कोणतीही कटुता आली नाही. करिश्माचे २००३ मध्ये बिझनेसमॅन संजय कपूरशी लग्न झाले, तेव्हा अक्षय खन्ना तिच्या लग्नाला उपस्थित होता.
advertisement
9/10
करिश्माच्या लग्नातील एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात अक्षयने करिश्माचे अभिनंदन करताना तिच्या हातावर किस केलं होतं. यावेळी करिश्मा खूप आनंदी दिसत होती.
advertisement
10/10
करिश्माचे लग्न ११ वर्षांनंतर तुटले आणि तिला दोन मुले आहेत. तर अक्षय खन्ना आजही बॅचलर आहे. त्याने अनेकदा मुलाखतीत सांगितले आहे की, तो कमिटमेंट-फोबिक आहे आणि त्याला त्याच्या आयुष्यावर पूर्ण नियंत्रण हवे आहे, जे लग्नानंतर शक्य होत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मी लग्नासाठी बनलो नाही' म्हणणारा अक्षय खन्ना 'या' अभिनेत्रीसाठी होता वेडा! लग्नाची तयारीही झाली, मग कुठे माशी शिंकली?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल