TRENDING:

गौतमी पाटीलचा नादच करायचा नाही! फक्त एका शोसाठी घेते बक्कळ पैसे, आकडा पाहून चक्कर येईल

Last Updated:
Gautami Patil Per Event Fees : गौतमी पाटील तिच्या खास लावणी नृत्यामुळे आणि तिच्या मॉडर्न स्टाईलमुळे खूप लोकप्रिय आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, एका शोसाठी गौतमी पाटील किती पैसे घेते?
advertisement
1/6
गौतमी पाटील फक्त एका शोसाठी घेते बक्कळ पैसे, आकडा पाहून चक्कर येईल
मुंबई: महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात, शहरात सध्या दहीहंडीचा मोठा उत्साह आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम सुरू आहेत आणि या कार्यक्रमांमध्ये सध्या एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे नृत्यांगना गौतमी पाटील. तिच्या नृत्यावर फक्त तरुणाईच नाही, तर गोविंदाही थिरकताना दिसत आहेत.
advertisement
2/6
गौतमी पाटील तिच्या खास लावणी नृत्यामुळे आणि तिच्या मॉडर्न स्टाईलमुळे खूप लोकप्रिय आहे. विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांमध्ये तिचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे तिचे कार्यक्रम नेहमीच हाऊसफुल्ल असतात. अशातच यंदा गौतमी पाटील मुंबईच्या बोरिवली येथील मागाठाणेमध्ये सुरू असलेल्या दहीहंडी उत्सवात सहभागी झाली आहे.
advertisement
3/6
यावेळी तिच्या मादक अदांनी गोविंदांना घायाळ केलं आहे. उत्सवाला हजेरी लावलेल्या प्रत्येकाने तिच्या डान्सचा आनंद लुटला. पण तुम्हाला माहीत आहे का, या एका शोसाठी गौतमी पाटील किती पैसे घेते?
advertisement
4/6
गौतमी पाटील तिच्या डान्समुळे जितकी प्रसिद्ध झाली, तितकीच ती तिच्या काही वादग्रस्त नृत्यामुळे चर्चेतही राहिली आहे. पण या वादामुळे तिच्या लोकप्रियतेवर कोणताही परिणाम झाला नाही. उलट, तिच्या कार्यक्रमांची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
advertisement
5/6
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौतमी पाटील एका दहीहंडीच्या शोसाठी सुमारे 3 ते 5 लाख रुपये घेते. तिचा आणि तिच्या टीमचा महिन्याचा एकूण खर्च पाहता, तिची कमाईही मोठी आहे. एका महिन्यात तिच्या टीमची कमाई 45 ते 50 लाख रुपयांच्या घरात जाते, असं म्हटलं जातं.
advertisement
6/6
स्थानिक ग्रुप्स आणि उत्सव कमिटी गौतमीला आपल्या कार्यक्रमात बोलवण्यासाठी मोठी रक्कम देतात, ज्यामुळे तिची फी आणखी वाढली असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ती महाराष्ट्रातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक बनली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
गौतमी पाटीलचा नादच करायचा नाही! फक्त एका शोसाठी घेते बक्कळ पैसे, आकडा पाहून चक्कर येईल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल