'तारक मेहता' शोमधील प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, दिशा वकानीशी अत्यंत जवळचं नातं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
तारक मेहता शोमधील प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झालं आहे. अभिनेत्याचं अभिनेत्री दिशा वकानीशी अत्यंत जवळचं नातं आहे.
advertisement
1/8

'तारक मेहता का उल्टा चश्मा' शोचे निर्माते असित मोदी यांनी एक दुःखद बातमी दिली. शोची फेव्हरेट हिरोईन दया बेन म्हणजेच अभिनेत्री दिशावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शोमधील प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झालं. या अभिनेत्याचं दिशा वकानीशी अत्यंत जवळचं नातं आहे.
advertisement
2/8
भीम वकानी म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी यांचं निधन झालं आहे. यांच्या निधनाने टीव्ही आणि चित्रपटसृष्टीत धक्का बसला आहे. दिशा वकानीचे वडील असण्यासोबतच ते एक प्रतिभावान अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रकारही होते. त्यांनी शाहरुख खान, सलमान खान आणि अजय देवगण यांच्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
advertisement
3/8
'तारक मेहता का...' चे निर्माते असित मोदी यांनी सोशल मीडियावर ही बातमी शेअर करून आपले दुःख व्यक्त केले. ज्येष्ठ अभिनेते भीम वकानी यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. दिशा वकानीच्या वडिलांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला होता आणि दिशा वकानीच्या मालिकेतही त्यांची विशेष भूमिका होती.
advertisement
4/8
'तारक मेहता का उल्टा चश्मा'चे निर्माते असित मोदी यांनी सांगितले की, भीम वकानी एक उत्कृष्ट अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रकार होते. ज्यांनी आपल्या कामातून इंडस्ट्रीत स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. जेव्हा जेव्हा ते मुंबईला येत तेव्हा ते असित मोदींना भेटत असत आणि त्या दोघांमध्ये एक घनिष्ठ नातं होतं. त्यांनी या मालिकेच्या एका भागात जेठालालच्या बापूजींच्या मित्राची भूमिका साकारली होती.
advertisement
5/8
भीम वकानी यांनी आपल्या कारकिर्दीत असंख्य चित्रपट आणि टीव्ही प्रोजेक्ट्समध्ये अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी शाहरुख खान, आमिर खान आणि अजय देवगण यांसारख्या कलाकारांसोबत काम केलं आहे.
advertisement
6/8
भीम वकानी यांनी 'लगान', 'हम दिल दे चुके सनम', 'स्वदेस' आणि 'देवदास' यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये छोट्या पण प्रभावी भूमिका साकारल्या. इतकंच नाही तर गुजराती रंगभूमीवरील त्याचं योगदानही प्रशंसनीय आह. जिथे त्याने अनेक वर्षे उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
advertisement
7/8
दुसरीकडे दिशा वकानी तारक मेहता शोमधून गायब झाल्यामुळे बऱ्याच काळापासून चर्चेचा विषय बनली आहे. 2018 मध्ये प्रसूती रजेवर गेल्यापासून ती शोमध्ये परतलेली नाही.
advertisement
8/8
दरम्यान शोची एक्स अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीनं दावा केला आहे की, दिशा वकानी कोणत्याही परिस्थितीत शोमध्ये परत येणार नाही. असित मोदी दिशा वकानीच्या नावाखाली चाहत्यांची फसवणूक करत आहे. ती परत येणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'तारक मेहता' शोमधील प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, दिशा वकानीशी अत्यंत जवळचं नातं