TRENDING:

तीन वेळा झालं लग्न, पदरात 2 मुली; TV ची फेमस अभिनेत्री आता चौथ्यांदा बांधणार लग्नगाठ!

Last Updated:
आजच्या काळात लोकांची एक लग्न होत नाहीत. तर प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीला चौथ्यांदा लग्न करायचं आहे. लग्न कसं करायचं आहे याचा प्लानही तिने सांगितला.
advertisement
1/7
तीन वेळा झालं लग्न, पदरात 2 मुली; फेमस अभिनेत्री आता चौथ्यांदा बांधणार लग्नगाठ!
इथे लोकांची एक लग्न होणं कठिण झालेलं असताना प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीला चौथ्यांदा लग्न करायचं आहे. अभिनेत्रीची तीन लग्न झाली आहेत. तिला दोन मुली देखील आहेत. मात्र तिने आता चौथ्यांदा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
advertisement
2/7
टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री देबिना बॅनर्जी हिनं चौथ्यांदा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दुसऱ्या पुरूषांसोबत नाही तर तिच्याच नवऱ्यासोबत.  देबिना आणि तिचा नवरा गुरमीत एल्विश यादवच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाले होते तिथे देबिना हे म्हणाली.
advertisement
3/7
पॉडकास्टदरम्यान एल्विश यादवने देबिना आणि गुरमीतला प्रश्न विचारला की, "तुम्ही तर तीन-तीन वेळा लग्न केलं आहे आता चौथ्यांदा करणार का?" या प्रश्नावर दोघेही हसले.
advertisement
4/7
त्यावर गुरमीत म्हणाला की, "आता चौथ्यांदा लग्न केलं तर मुलीही ते पाहू शकतील." यावर देबिनानं लगेचच "हो, मग आपण व्हाईट वेडिंग करूया," असं उत्तर दिलं.
advertisement
5/7
पुढे एल्विश यादव म्हणाला, "तुमचं लग्न तर दर 12 वर्षांनी होतं". त्यावर देबिनाने त्यांच्या पहिल्या लग्नाची स्टोरी सांगितली. ती म्हणाली की, आम्ही दोघे खूप लहान होतो. मी साऊथमध्ये शूटींग करताना आमच्या फोनवर प्रेमाची गप्पा व्हायच्या. त्याच भावनेतून आम्ही अचानक मंदिरात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुंबईला येण्याच्या आधीच किंवा त्याच दिवशी लग्नाची तयारी केली होती.
advertisement
6/7
देबिना आणि गुरमीत यांचं पहिलं लग्न 2006 साली झालं. त्यानंतर त्यांनी 2011 मध्ये आणि तिसऱ्यांदा 2021 मध्ये पुन्हा लग्न केलं. तिन्ही वेळा त्यांचं लग्न साध्या पद्धतीनं झालं होतं. देबिना म्हणाली, चौथं लग्न थाटामाटात व्हायला हवं. आपली एक लग्न लॉस एंजेलिसमध्येही व्हायला हवं."
advertisement
7/7
देबिनाच्या या इच्छेवर गुरमीतनं गंमतीशीर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, "किती वेळा लग्न करणार? एकदाच सगळा खर्च करूया". देबिनाचं हे वक्तव्य मजेशीर असलं तरी सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
तीन वेळा झालं लग्न, पदरात 2 मुली; TV ची फेमस अभिनेत्री आता चौथ्यांदा बांधणार लग्नगाठ!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल