TRENDING:

बॉलिवूड हिरोईन्सपेक्षाही हॉट आहेत Dhurandhar 2 फेम 'जमील जमाली'च्या मुली! जावई तर थेट रणवीर सिंगला देतो टक्कर

Last Updated:
Rakesh Bedi Daughter : धुरंधर 2 मध्ये अभिनेत्री सारा अर्जुनने राकेश यांच्या मुलीची भूमिका साकारली आहे. पण राकेश यांच्या खऱ्या मुलींना तुम्ही कधी पाहिल्या आहेत का?
advertisement
1/11
बॉलिवूड हिरोईन्सपेक्षाही हॉट आहेत Dhurandhar 2 फेम 'जमील जमाली'च्या मुली! जावई तर...
धुरंधर २ ने रिलीजच्या पहिल्या दिवसांपासूनच अनेक रेकॉर्ड्स मोडायला सुरुवात केली आहे. अवघ्या ३ दिवसात जगभरात ५०० कोटींहून अधिकची कमाई केलेल्या धुरंधरने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. रणवीर सिंग, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर माधवन, राकेश बेदी यांनी तगड्या भूमिका साकारल्या आहेत.
advertisement
2/11
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते राकेश बेदी धुरंधरमध्ये 'जमील जमाली' ही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. यामध्ये ते पाकिस्तानातील पॉवरफुल नेत्याच्या भूमिकेत आहेत. तर अभिनेत्री सारा अर्जुनने राकेश यांच्या मुलीची भूमिका साकारली आहे. पण राकेश यांच्या खऱ्या मुलींना तुम्ही कधी पाहिल्या आहेत का?
advertisement
3/11
७१ वर्षीय राकेश बेदी यांना दोन मुली असून दिसायला त्या एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीत. धुरंधरमधील राकेश यांच्या पात्राचं खूप कौतुक झालं. अशातच नेटकऱ्यांनी राकेश बेदी यांच्या मुलीबद्दल अधिक माहिती शोधून काढली आहे.
advertisement
4/11
राकेश बेदी यांना दोन मुली असून दोघीही मनोरंजन विश्वाशी संबंधित आहेत. एकीने वडिलांप्रमाणे अभिनयाची वाट धरली, तर एकीने इतरांना आपल्या तालावर नाचवण्याचं आव्हान स्वीकारलं.
advertisement
5/11
राकेश बेदी यांच्या मोठ्या मुलीचं नाव रिद्धिमा असून तिने आपल्या वडिलांचा अभिनयाचा वारसा पुढे नेण्याचं काम निवडलं आहे. तिने अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
advertisement
6/11
नेटफ्लिक्सची गाजलेली सीरिज 'लिटिल थिंग्स' आणि 'संहार' सारख्या प्रोजेक्ट्समध्ये रिद्धिमाने आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली आहे. इतकंच नाही, तर रिद्धिमाने 'माय पापा ग्रेटेस्ट' या चित्रपटात काम केलं होतं, ज्यासाठी तिला 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' हा पुरस्कारही मिळाला.
advertisement
7/11
रिद्धिमा केवळ आपल्या वडिलांचा अभिनयाचा वारसा पुढे नेत नाही आहे, तर तिच्या अंगी वडिलांप्रमाणेच कॉमेडीचं कमाल टाइमिंग आहे. रिद्धिमा एक उत्कृष्ट स्टँडअप कॉमेडियन म्हणूनही स्टेजवर धुमाकूळ घालत असते.
advertisement
8/11
राकेश बेदींच्या दुसऱ्या लेकीचं नाव आहे रितिका बेदी. रितिका दिसायला अतिशय सुंदर असून सोशल मीडियावर रितिकाचे हजारो चाहते आहेत. रितिकाला ताहा शाह, किश्वर मर्चंट आणि सलोनी बत्रा यांसारखे मोठे कलाकार फॉलो करतात.
advertisement
9/11
रितिका इन्स्टाग्रामवर जबरदस्त कंटेंट तयार करते. तिला फिरण्याची आणि विशेषतः डान्सची प्रचंड आवड आहे.
advertisement
10/11
राकेश यांच्या मोठ्या लेकीचं लग्न झालं असून तिच्या पतीचं नाव श्रेय आझाद आहे. श्रेय आझाद हे नाव ट्रॅव्हल विश्वात मोठं मानलं जातं. श्रेय हे एक प्रसिद्ध ट्रॅव्हलर आहेत. आतापर्यंत त्यांनी जगातील ४८ देशांमध्ये प्रवास केला आहे.
advertisement
11/11
इतकंच नाही, तर रिद्धिमाचे पती श्रेय ट्रॅव्हलिंगसोबतच एक उत्तम डीजे देखील आहेत. त्यांचा स्वॅग आणि लूक पाहिला तर ते कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्याला टक्कर देऊ शकतात, असं चाहत्यांचं म्हणणं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बॉलिवूड हिरोईन्सपेक्षाही हॉट आहेत Dhurandhar 2 फेम 'जमील जमाली'च्या मुली! जावई तर थेट रणवीर सिंगला देतो टक्कर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल