'गोल्ड डिगर नाही, मी डायमंड डिगर कारण...', 2 वर्षांआधी मराठी मुलाशी लग्न, डिवोर्सच्या चर्चांवर अभिनेत्रीनं सोडलं मौन
- Published by:Minal Gurav
Last Updated:
The 50 शोमध्ये गोल्ड डिगरचा आरोप झालेल्या दिव्या अग्रवालने पहिल्यांदाच यावर मौन सोडलं आहे. डिवोर्सच्या चर्चांवरही ती बोलली.
advertisement
1/7

The 50 या रिअॅलिटी शोमध्ये दोन अभिनेत्रींमध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती. वैयक्तिक विषयांवर The 50 मध्ये दोघींची भांडणं झाली. अभिनेत्रीवर गोल्ड डिगर असल्याचा आरोप करण्यात आला होता.
advertisement
2/7
अलिकडेच बाहेर पडलेल्या अभिनेत्री दिव्या अग्रवालने तिच्या लग्नाच्या आणि पती अपूर्व पाडगावकरशी घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडलं शो दरम्यान स्पर्धक भव्या सिंगने दिव्यावर गोल्ड डिगर असल्याचा आरोप केला. ती नवऱ्यापासून वेगळी झाल्याचंही म्हटलं होतं. त्या सगळ्या आरोपांवर दिव्याने अखेर मौन सोडलं आहे. आता, दिव्याने या सर्व आरोपांना उत्तर दिले आहे.
advertisement
3/7
झूम आणि टेलिटॉक इंडियाला दिलेल्या मुलाखतींमध्ये अभिनेत्री दिव्या अग्रवाल म्हणाली, "हो मी माझा पती अपूर्वपासून वेगळी राहत आहे. मी माझ्या कामाच्या ठिकाणी राहते आणि तो त्याच्या जवळ राहतो. आम्ही अजूनही प्रेमींसारखे भेटतो. आमचं लग्न आणि प्रेम दोन्ही नेहमीसारखेच जिवंत आहेत आणि लोकांकडे अपूर्ण माहिती आहे."
advertisement
4/7
भव्या सिंग दिव्याला गोल्ड डिगर म्हटलं होतं. यावर सारकॅझ उत्तर देत दिव्या म्हणाली, "मी गोल्ड डिगर नाही, पण मला स्वत:ला डायमंड डिगर म्हणावसं वाटेल. कारण माझा नवरा डायमंड आहे."
advertisement
5/7
दिव्याने The 50 मधून बाहेर पडल्यावर तिच्या पतीची प्रतिक्रियाही सांगितली. ती म्हणाली, "जेव्हा मी शोमधून बाहेर पडले तेव्हा अपूर्वने मला खूप टेस्टी जेवण करून दिलं. मला वाटतं की फक्त जेवणच मला बरं करू शकते."
advertisement
6/7
ती पुढे म्हणाली की, तिचा नवरा तिच्या जगापासून खूप दूर आहे आणि तिला फक्त ती आनंदी आणि निरोगी हवी आहे.
advertisement
7/7
दिव्या अग्रवालने फेब्रुवारी 2024 मध्ये पारंपारिक मराठी विधींनुसार बिझनेसमन अपूर्व पाडगावकरशी लग्न केले. लग्नानंतर काही महिन्यांनीच त्यांच्या डिवोर्सच्या अफवा पसरू लागल्या ज्या दिव्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे फेटाळून लावल्या होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'गोल्ड डिगर नाही, मी डायमंड डिगर कारण...', 2 वर्षांआधी मराठी मुलाशी लग्न, डिवोर्सच्या चर्चांवर अभिनेत्रीनं सोडलं मौन