'धुरंधर 2' मधील 'बडे साहब'च्या नावावरून पडदा उठला! बॉलिवूडचा लव्हर बॉय दिसणार खूंखार व्हिलनच्या रुपात, समोर आली मोठी अपडेट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dhurandhar च्या पहिल्या भागात ज्या नावाचा केवळ उल्लेख झाला आणि ज्याने पडद्यामागून सगळी सूत्रं हलवली, त्या 'बडे साहब'च्या चेहऱ्यावरून पडदा उठल्याचं बोललं जातंय. ते नाव ऐकून चाहत्यांनाही धक्का बसला आहे.
advertisement
1/9

काही चित्रपट असे येतात, जे केवळ मनोरंजन करत नाहीत तर एक वलय निर्माण करतात. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' त्यापैकीच एक. पहिल्या भागाच्या १३०० कोटींच्या विक्रमी कमाईनंतर आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या 'धुरंधर २: द रिव्हेंज'कडे.
advertisement
2/9
पण सध्या सोशल मीडियावर एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे रहस्यमयी व्हिलन 'बडे साहब' नक्की कोण? पहिल्या भागात ज्या नावाचा केवळ उल्लेख झाला आणि ज्याने पडद्यामागून सगळी सूत्रं हलवली, त्या 'बडे साहब'च्या चेहऱ्यावरून पडदा उठल्याचं बोललं जातंय आणि ते नाव ऐकून चाहत्यांनाही धक्का बसला आहे.
advertisement
3/9
ऑनलाइन फिल्म प्लॅटफॉर्म 'लेटरबॉक्स्ड'वर धुरंधर २ च्या कास्ट लिस्टमध्ये एका अशा नावाचा समावेश झाला आहे, ज्याने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.
advertisement
4/9
हे नाव आहे, इमरान हाश्मी! इमरानला या चित्रपटाच्या मुख्य कलाकारांच्या यादीत स्थान देण्यात आलं आहे. पहिल्या भागात अक्षय खन्नाने साकारलेल्या 'रेहमान डकैत'च्या मृत्यूनंतर, खऱ्या मास्टरमाइंडच्या रूपात इमरान हाश्मी रणवीर सिंगच्या 'हमजा'समोर उभा ठाकणार असल्याची दाट शक्यता आहे.
advertisement
5/9
चाहत्यांनी तर आतापासूनच या कास्टिंगचं स्वागत केलं आहे. एका युजरने लिहिलंय, "इमरानचा स्क्रीन प्रेझेन्स आणि त्याची अलीकडची खलनायकी रूपं पाहता, 'बडे साहब'साठी तोच परफेक्ट चॉइस आहे."
advertisement
6/9
'धुरंधर २' मध्ये केवळ इमरानच नाही, तर इतरही अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. जुन्या भूमिकांमध्ये रणवीर सिंह (हमजा), अर्जुन रामपाल (मेजर इक्बाल), आर. माधवन, संजय दत्त आणि सारा अर्जुन असतील.
advertisement
7/9
तर, राज जुत्शी (पाकिस्तानी जनरलच्या भूमिकेत) आणि यामी गौतम हिचा एक विशेष कॅमिओ असण्याची शक्यता आहे. सूडाची आग आणि हमजा-मेजर इक्बाल यांच्यातील जबरदस्त टशन या भागात केंद्रस्थानी असेल.
advertisement
8/9
जरी लेटरबॉक्स्डवर इमरानचं नाव दिसत असलं, तरीही ही माहिती खात्रीलायक नाही. कारण आयएमडीबीप्रमाणेच हे एक सार्वजनिक व्यासपीठ आहे, जिथे माहिती एडिट केली जाऊ शकते. चित्रपटाच्या टीमने अद्याप अधिकृतपणे इमरानच्या नावावर शिक्कामोर्तब केलेलं नाही.
advertisement
9/9
'धुरंधर २' साठी रस्ता सोपा नाही. १९ मार्च २०२६ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे, पण याच दिवशी दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा पॅन-इंडिया चित्रपट 'टॉक्सिक' (Toxic) देखील प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. रणवीर विरुद्ध यश अशा या दोन बहुप्रतिक्षित चित्रपटांच्या टकरीत कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'धुरंधर 2' मधील 'बडे साहब'च्या नावावरून पडदा उठला! बॉलिवूडचा लव्हर बॉय दिसणार खूंखार व्हिलनच्या रुपात, समोर आली मोठी अपडेट