Gautami Patil: 'त्यांना एकदाही वाटलं नाही...', वडिलांच्या आठवणीत ढसाढसा रडली गौतमी पाटील, सांगितली मनातली 'ती' एक खंत
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Gautami Patil: नुकत्याच एका मुलाखतीत गौतमीने तिच्या वडिलांबद्दल जे भाष्य केलंय, ते ऐकून कोणाचं काळीज हेलावून जाईल.
advertisement
1/8

"सबसे कातिल गौतमी पाटील..." या एका वाक्यावर अख्खा महाराष्ट्र थिरकतो. जिथे गौतमीचा कार्यक्रम, तिथे हजारोंची गर्दी आणि चाहत्यांचा राडा, हे समीकरण आता नवीन राहिलं नाही.
advertisement
2/8
पण स्टेजवर आपल्या अदांनी घायाळ करणाऱ्या या गौतमीच्या आयुष्यात किती जखमा दडलेल्या आहेत, याची जाणीव खूप कमी लोकांना आहे. नुकत्याच एका मुलाखतीत गौतमीने तिच्या वडिलांबद्दल जे भाष्य केलंय, ते ऐकून कोणाचं काळीज हेलावून जाईल.
advertisement
3/8
गौतमीच्या जन्माआधीच तिचे आई-वडील वेगळे झाले होते. त्यामुळे वडिलांचं नाव माहीत असूनही त्यांचं प्रेम तिला कधीच मिळालं नाही.
advertisement
4/8
गौतमी सांगते, "मी लहानपणापासून माझ्या आजोबांकडेच वाढले. त्यांनी आणि माझ्या आईने मला कधीच कशाची कमी भासू दिली नाही. शाळा असो किंवा हट्ट, जिथे वडिलांची गरज होती तिथे माझे आजोबा खंबीरपणे उभे राहिले. पण तरीही शाळेत इतर मैत्रिणींना त्यांच्या बाबांसोबत पाहिलं की कुठेतरी वाईट वाटायचं."
advertisement
5/8
लहान असताना गौतमी आपल्या आईला नेहमी प्रश्न विचारायची, "आई, बाबा कुठे आहेत? ते काय करतात? आपल्याकडे का येत नाहीत?" पण आईकडे या प्रश्नांची उत्तरं नव्हती, किंवा कदाचित ती उत्तरं देण्याची ताकदही नव्हती.
advertisement
6/8
आई फक्त शांत राहायची. गौतमी म्हणते, "आज जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा जाणवतं की माझ्या त्या प्रश्नांनी आईला किती त्रास झाला असेल. पण तिने मोठ्या संयमाने मला सांभाळलं."
advertisement
7/8
गौतमीचे वडील रवींद्र पाटील काही काळापूर्वी धुळ्यात अत्यंत खालावलेल्या आणि बेवारस स्थितीत सापडले होते. जेव्हा ही बातमी गौतमीला कळाली, तेव्हा तिने कोणताही जुना राग मनात न धरता धाव घेतली. आपल्या वडिलांवर तिने उपचार केले, त्यांची सेवा केली.
advertisement
8/8
वडील आता या जगात नाहीत. त्यांच्या निधनाबद्दल बोलताना गौतमी भावूक झाली. ती म्हणाली, "मनात एकच मोठी खंत आहे. त्यांना कधीच वाटलं नसेल का की आपली एक मुलगी आहे, तिला जाऊन भेटावं? तिच्या पाठीवर हात ठेवावा? तो एक विचार आजही मनात सलतो. पण समाधान एकाच गोष्टीचं आहे की, शेवटच्या क्षणी मी त्यांच्यासोबत होते."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Gautami Patil: 'त्यांना एकदाही वाटलं नाही...', वडिलांच्या आठवणीत ढसाढसा रडली गौतमी पाटील, सांगितली मनातली 'ती' एक खंत