TRENDING:

Elvish Yadav: 'माझं प्रेम सापडलं', रितेश देशमुखच्या हिरोईनला डेट करतोय एल्विश यादव? थेट साखरपुड्याचा फोटो शेअर केला

Last Updated:
Elvish Yadav engagement: सोशल मीडिया किंग आणि 'बिग बॉस OTT २' चा विजेता एल्विश यादव नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. पण यावेळी चक्क त्याच्या साखरपुड्याची रंगली आहे.
advertisement
1/8
'माझं प्रेम सापडलं', रितेश देशमुखच्या हिरोईनला डेट करतोय एल्विश यादव?
सोशल मीडिया किंग आणि 'बिग बॉस OTT २' चा विजेता एल्विश यादव नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. पण यावेळी चर्चा त्याच्या वादाची नाही, तर चक्क त्याच्या साखरपुड्याची रंगली आहे. निमित्त ठरलंय ते म्हणजे एल्विशने शेअर केलेली एक इन्स्टाग्राम स्टोरी!
advertisement
2/8
या स्टोरीमध्ये एका मुलीच्या हातात अंगठी दिसत असून, एल्विशने दिलेल्या कॅप्शनमुळे चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. त्यातच अभिनेत्री जिया शंकर हिचं नाव जोडलं गेल्याने चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
3/8
एल्विश यादवने आपल्या इन्स्टाग्रामवर एक अत्यंत 'रोमँटिक' आणि 'क्रिप्टिक' फोटो शेअर केला. या फोटोत एका मुलीचा हात दिसत असून तिच्या बोटात हिऱ्याची अंगठी आहे. या फोटोला कॅप्शन देताना एल्विशने लिहिलं, "प्रेमाला आणखी एक संधी दिली... अखेर मला माझं प्रेम सापडलं!"
advertisement
4/8
एल्विशची ही पोस्ट पाहून चाहत्यांना वाटलं की तो आता खरंच बोहल्यावर चढणार की काय? एल्विशने या फोटोमध्ये जिया शंकरला टॅग केलं. जियानेही वेळ न घालवता हीच स्टोरी रि-शेअर केली आणि त्यावर फक्त एक हार्ट इमोजी टाकला. या एका हार्टमुळे सोशल मीडियावर अफवांचा अक्षरशः पाऊस पडला.
advertisement
5/8
जिया आणि एल्विश 'बिग बॉस'च्या घरापासून चांगले मित्र आहेत. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांनाही खूप आवडते. त्यामुळे या दोघांनी गुपचूप साखरपुडा तर उरकला नाही ना? असा प्रश्न विचारला जात आहे.
advertisement
6/8
दरम्यान, याआधी अभिनेत्री जिया शंकरचं नाव अभिषेक मल्हानशी जोडलं जात होतं. गेल्याच महिन्यात जियाने एक स्टोरी शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला होता. तिने एक फोटो शेअर केला होता, ज्यात एक व्यक्ती तिच्या कपाळावर किस करत आहे. यावर जियाने म्हटलं होतं, चुकीच्या अफवा २०२५ मध्ये सोडून देऊया.
advertisement
7/8
मात्र, इंडस्ट्रीतील जाणकारांच्या मते, हा केवळ एखादा नवीन म्युझिक व्हिडिओ किंवा वेब सीरिजच्या प्रमोशनचा भाग असू शकतो. या दोघांनीही अद्याप यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलेलं नाही, त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली आहे.
advertisement
8/8
सध्या एल्विश यादव 'लाफ्टर शेफ्स'च्या तिसऱ्या सीझनमध्ये धुमाकूळ घालत आहे. याआधी त्याने करण कुंद्रासोबत या शोच्या दुसऱ्या सीझनचं विजेतेपदही पटकावलं होतं. 'बिग बॉस OTT २' मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेऊन इतिहास रचणारा एल्विश आता वैयक्तिक आयुष्यातही काहीतरी नवा धमाका करणार का? हे येणारा काळच सांगेल.<span style="font-size: 20px;"> </span><span style="font-size: 20px;"> </span> <span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Elvish Yadav: 'माझं प्रेम सापडलं', रितेश देशमुखच्या हिरोईनला डेट करतोय एल्विश यादव? थेट साखरपुड्याचा फोटो शेअर केला
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल