IND vs PAK : पाकिस्तानच्या कॅप्टनची लेव्हलचं वेगळी, भारताविरुद्ध फायनल खेळणार का नाही? उत्तर ऐकून सगळेच गोंधळले!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
7 फेब्रुवारीपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे. पण भारत-पाकिस्तान सामन्यावरून सुरू असलेला वाद कमी व्हायचं नाव घेत नाहीये.
advertisement
1/7

15 तारखेला होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यावर आम्ही बहिष्कार टाकत असल्याचं पाकिस्तान सरकारने जाहीर केलं आहे. बांगलादेशला वर्ल्ड कपमधून बाहेर केल्याचा निषेध म्हणून आम्ही हा निर्णय घेतल्याचं पाकिस्तानने सांगितलं आहे.
advertisement
2/7
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला पाकिस्तानने टाकलेल्या बहिष्काराविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा आम्ही या सामन्यासाठी कोलंबोला जाणार आहोत, आमच्या विमानाचं तिकीटही बुक झालं आहे, असं उत्तर सूर्याने दिलं.
advertisement
3/7
पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा यालाही बहिष्काराबद्दल प्रश्न विचारला गेला. तेव्हा भारताविरुद्ध खेळणं आमच्या हातात नाही, हा सरकारचा निर्णय आहे, असं उत्तर सलमान आगाने दिलं.
advertisement
4/7
सलमान आगाला पाकिस्तानची टीम सेमी फायनल किंवा फायनलला पोहोचली आणि समोर भारतीय टीम असेल तरी तुम्ही बहिष्कार टाकणार का? असा प्रश्न सलमान आगाला विचारण्यात आला. यावर तेव्हाही सरकार सांगेल तेच आम्ही करू, असं सलमान आगा म्हणाला आहे.
advertisement
5/7
टीमचा फोकस फक्त क्रिकेटवर आहे, आम्ही बाहेरच्या गोष्टींवर लक्ष देत नाहीये, असं वक्तव्यही सलमान आगाने केलं आहे. तसंच बांगलादेशसोबत जे झालं ते दुर्भाग्यपूर्ण असल्याचंही सलमान आगा म्हणाला.
advertisement
6/7
आशिया कपनंतर आम्ही एकही सीरिज हरलेलो नाही, त्यामुळे टीमचा आत्मविश्वास वाढला आहे. टीमची कामगिरी सातत्याने सुधारत आहे, पण आम्ही कोणत्याच टीमला हलक्यात घेणार नाही, असं वक्तव्य सलमान आगाने केलं आहे.
advertisement
7/7
टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा पहिला सामना 7 फेब्रुवारीला नेदरलँड्सविरुद्ध, दुसरा सामना 10 फेब्रुवारीला युएसएविरुद्ध आणि 18 फेब्रुवारीला नामिबियाविरुद्ध होणार आहे. भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला तर पाकिस्तानला उरलेल्या तिन्ही मॅच जिंकाव्या लागणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : पाकिस्तानच्या कॅप्टनची लेव्हलचं वेगळी, भारताविरुद्ध फायनल खेळणार का नाही? उत्तर ऐकून सगळेच गोंधळले!