TRENDING:

गायत्री दातार वयाच्या 31 व्या वर्षी अडकणार विवाहबंधनात, होणाऱ्या पतीसोबतचा PHOTO शेअर करत दिली गुडन्यूज

Last Updated:
Gayatri Datar Engaged : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री गायत्री दातार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. होणाऱ्या पतीसोबतचा फोटो शेअर करत तिने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
advertisement
1/7
गायत्री दातारचं ठरलं! लवकरच अडकणार विवाहबंधनात PHOTOS
'तुला पाहते रे','अबीर गुलाल', 'बिग बॉस मराठी' अशा छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री गायत्री दातार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
advertisement
2/7
गायत्री दातारने सोशल मीडियावर फोटो शेअर करत साखरपुडा केला असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. गायत्रीची ही गुडन्यूज ऐकूण चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
advertisement
3/7
गायत्री दातारने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत गायत्री आणि तिचा होणारा पती दिसत आहेत. दोघेही एकमेकांकडे बघत आहेत.
advertisement
4/7
गायत्री दातारने दुसरा फोटो शेअर केलाय तो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. कारण या फोटोमध्ये गायत्रीच्या हातात अंगठी दिसत आहे. त्यामुळे गायत्रीने साखरपुडा केल्याचं स्पष्ट होतं.
advertisement
5/7
गायत्री दातारने होणाऱ्या पतीसोबतचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,"माझ्या आयुष्यात हिरोची एन्ट्री झाली आहे. आयुष्यातील सर्वात बेस्ट क्षण तुमच्यासोबत शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. 11.12. 2025".
advertisement
6/7
गायत्री दातारला 11 डिसेंबर 2025 रोजी बॉयफ्रेंडने प्रपोज केलं असून त्यांनी साखरपुडा केला आहे. गायत्रीच्या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
advertisement
7/7
गायत्रीच्या पोस्टवरील सुबोध भावेची कमेंट मात्र चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. "भारी... अभिनंदन तुम्हा दोघांचही", अशी कमेंट त्याने केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
गायत्री दातार वयाच्या 31 व्या वर्षी अडकणार विवाहबंधनात, होणाऱ्या पतीसोबतचा PHOTO शेअर करत दिली गुडन्यूज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल