IIT Bombay मधून शिक्षण, पालथं घातलंय अख्ख जग, अजून काय काय करतो गायत्री दातारचा होणारा नवरा?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Gayatri Datar Husband : 'तुला पाहते रे' फेम मराठी अभिनेत्री गायत्री दातारने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा अखेर सर्वांना दाखवला. काय करतो गायत्रीचा होणारा नवरा?
advertisement
1/9

2025 वर्षात अनेक मराठी सेलिब्रेटींनी लग्न केलं. डिसेंबर महिन्यात तर सर्वाधिक मराठी सेलिब्रेटींची लग्न झाली. कलाकारांच्या लग्नाची चर्चा होत असताना 'तुला पाहते रे' फेम अभिनेत्री गायत्री दातारनं देखील तिचं लग्न ठरल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली.
advertisement
2/9
गायत्रीनं गुपचूप साखरपुडा देखील उरकला. पण होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा मात्र दाखवला नव्हता. गायत्रीचा नवरा कोण आहे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. अखेर ख्रिसमसच्या दिवशी गायत्रीनं होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा सर्वांना दाखवला. गायत्रीचा नवरा काय करतो माहितीये?
advertisement
3/9
श्रीकांत चव्हरे असं गायत्री दातारच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे. गायत्रीनं समुद्रकिनारी शूट केलेला एक सुंदर व्हिडीओ शेअर करत नवऱ्याचा चेहरा दाखवला. सुंदर गुलाबी साडीत गायत्री नवऱ्यासोबत रोमँटीक होताना दिसली.
advertisement
4/9
Meet my Forever Santa असं कॅप्शन देत गायत्री दातारनं नवऱ्यासोबतचा व्हिडीओ शेअर केला. गायत्रीनं गुपचूप साखरपुडा उरकल्याची माहिती समोर आली होती. गायत्री लवकरच श्रीकांतबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे.
advertisement
5/9
गायत्री दातारचा नवरा नेमकं करतो काय हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे. गायत्रीचा नवरा श्रीकांत चव्हरेचं शिक्षण IIT बॉम्बेमधून झालं आहे.
advertisement
6/9
श्रीकांतचं सोशल मिडिया पेज चेक केलं असता त्याने स्वत: ची ओळख डिजिटल क्रिएटर अशी करून दिली आहे.
advertisement
7/9
श्रीकांत ड्रोन फोटोग्राफर आहे. त्याला फिरण्याची प्रचंड आवड आहे. त्याचप्रमाणे तो वाइल्ड लाइफ फोटोग्राफी देखील करतो.
advertisement
8/9
श्रीकांतला जगभरात भ्रमंतीची आवड आहे. तो भारताबरोबरच जपान, अमेरिका, चीन, कोलंबिया, व्हिएतनाम, युनायडेट अरब, केन्या सारख्या देशात फिरला आहे.
advertisement
9/9
गायत्री पेक्षा तिचा होणारा नवरा फारच वेगळा असल्याचं दिसतंय. अभिनेत्री आणि IIT टॉपर यांची जोडी नेमकी कशी जुळली हे जाणून घेण्यासाठी आता चाहते उत्सुक आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
IIT Bombay मधून शिक्षण, पालथं घातलंय अख्ख जग, अजून काय काय करतो गायत्री दातारचा होणारा नवरा?