TRENDING:

Girija Oak : 'कौतुक आहे तिचं पण...' नॅशनल क्रश झालेल्या गिरीजा ओकबाबत पहिल्यांदाच बोलले वडिल गिरीश ओक; व्यक्त केली खंत

Last Updated:
Girish Oak on Girija : गिरीजा ओक निळ्या साडीतील फोटोमुळे नॅशनल क्रश झाली. वडील गिरीश ओक यांनी तिचं कौतुक केलं पण एक खंत व्यक्त केली.
advertisement
1/8
'कौतुक आहे तिचं पण...' नॅशनल क्रश गिरीजाचे वडिल गिरीश ओक यांनी व्यक्त केली खंत
अभिनेत्री गिरीजा ओक काही महिन्यांपासून सोशल मीडियावर खूप ट्रेडिंग आहे. गिरीजाचा एक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आणि तो जगभरात पोहोचला. गिरीजा एका रात्रीत नॅशनल क्रश झाली.
advertisement
2/8
गिरीजाचा निळ्या साडीतील फोटो सोशल मीडियावर हिट झाला. त्यानंतर सगळ्यात स्थरातून गिरीजाचं कौतुक सुरू झालं. तिने अनेक मुलाखती देखील दिल्या.
advertisement
3/8
दरम्यान गिरीजाच्या नॅशनल क्रॅश होण्यावर तिचे वडिल गिरीज ओक यांची पहिलीच प्रतिक्रिया समोर आली आहे. लेकीच्या नॅशनल क्रश होण्यावर आणि इतकी प्रसिद्ध मिळवण्याबाबत त्यांची तिची कौतुक केलं पण त्याचबरोबर एक खंत देखील व्यक्त केली.
advertisement
4/8
लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत बोलताना गिरीश ओक म्हणाले, "कौतुक आहे मला तिचं. तिच्या कामाचं. एकंदर गिरिजा जे काही करतेय त्याचं नेहमीच मला कौतुक असतं आणि ते कायम असायलाच पाहिजे."
advertisement
5/8
"पण त्या फोटोंवर ज्या कमेंट्स येतात... चेहरा नसलेला, आवाज नसलेली, बिनकामाची, रिकामटेकडी लोक. त्यांची बौद्धिक कुवत कितपत आहे मला माहिती नाही. पण पडद्याआडून भित्र्यासारखे कमेंट करत असतात. या सगळ्या प्रकाराची मला किळस येते."
advertisement
6/8
"माझ्यासारखा माणूस या सगळ्याने डिस्टर्ब होत नाही. पण एखादा सेंसिटिव्ह माणूस त्याने डिस्टर्ब होऊ शकतो. पण त्यावर काही इलाज नाही. त्या माणसांना काम धंदे नाही, त्यांच्यावर निर्बंध नाहीये. त्यांना करताना कळत नाहीये की आपण काय करतोय", असंही गिरीश ओक म्हणाले.
advertisement
7/8
गिरीश ओक यांनी अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्यावर होणाऱ्या ट्रोलिंगवरही भाष्य केलं. ते म्हणाले, " मध्यंतरी काही लोक सचिन पिळगांवकरांवर ट्रोलिंग होतं हे ऐकलं. हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. तो माणूस वयाच्या 5-6 व्या वर्षी कामाला लागला आहे. किती संपर्क, किती माहिती असेल त्यांना. त्याच्यावर तुम्ही त्यांना वाट्टेल ते ट्रोल करता. तुमची लायकी तरी आहे का?"
advertisement
8/8
"सोशल मीडियावर अनेक गोष्टींची मला नापसंती आहे. किळस वाटते मला. मागून टपली मारून हसण्यासारखं ते वाटतं. मी सोशल मिडिया वापरतो. स्टँडअप कॉमेडी पाहतो, मलाही आवडतं. पण ट्रोलिंग मला अजिबात पटत नाही. त्याला काहीच अर्थ नाही आणि मी कितीही बोललो तरी ते थांबणार नाही."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Girija Oak : 'कौतुक आहे तिचं पण...' नॅशनल क्रश झालेल्या गिरीजा ओकबाबत पहिल्यांदाच बोलले वडिल गिरीश ओक; व्यक्त केली खंत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल