एकेकाळी मुलाच्या नावामुळे ट्रोल झालेली बेबो, करीना कपूरचं नाव कसं पडलं माहितीये, नावाचा अर्थ काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Kareena Kapoor Name Story : अभिनेत्री करीना कपूर जी तिचा मुलगा तैमूरच्या नावामुळे ट्रोल झाली होती. पण करीनाच्या नावामागेही इंटरेस्टिंग स्टोरी आहे.
advertisement
1/7

अभिनेत्री करीना कपूरने तिच्या पहिल्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं आणि ती खूप ट्रोल झाली होती. करीना कपूरच्या नावामागील स्टोरीही इंटरेस्टिंग आहे. हे नाव काही असंच पडलं नाही तर त्यामागे एक खास कहाणी आहे.
advertisement
2/7
करीना कपूर जिचं टोपणनाव बेबो असं आहे. म्हणजे तिला प्रेमाने बेबो अशी हाक मारतात. कपूर कुटुंबात टोपणनावांची प्रथाच आहे. आपल्या बेबो या नावाबाबत सांगताना करीनाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की तिच्या पालकांना तिची मोठी बहीण लोलोशी मिळतंजुळतं टोपणनाव हवं होतं, जे त्यांनी बेबो असं ठेवलं.
advertisement
3/7
करीना कपूरचा जन्म 21 सप्टेंबर 1980 रोजी मुंबईत झाला. त्याच्या एक आठवड्याआधीच करीनाचे काका ऋषी कपूर यांच्याही घरी मुलीचा जन्म झाला होता, तिचं नाव रिद्धिमा म्हणजे रणबीर कपूरची बहीण आणि करीनाची चुलत बहीण.
advertisement
4/7
त्यामुळे रिद्धिमा जन्मानंतर जन्माला आलेली म्हणून त्यांचे आजोबा राज कपूर यांनी करीनाचं नाव सिद्धिमा ठेवायचं असं ठरवलं. गणेशाच्या दोन पत्नी रिद्धी-सिद्धीवरून ही नावं.
advertisement
5/7
पण असं म्हणतात की करीनाची आई बबिता कपूरने आपल्या दुसऱ्या मुलीचं नाव सिद्धिमा न ठेवता करीना ठेवलं. याचं कारण म्हणजे करीना पोटात होती तेव्हा बबिता लिओ टॉलस्टॉय यांचं Anna Karenina या पुस्तक वाचत होती. त्यामुळे त्या नावात किंचितसा बदल करून करीना असं नाव ठेवलं गेलं.
advertisement
6/7
करीना हे नाव संस्कृत नाही, भारतीयही नाही. पण उच्चाराने ते भारतीय वाटतं, म्हणून भारतात सहज स्वीकारलं गेलं. करीना हे नाव लॅटिन किंवा स्कॅन्डिनेव्हियन मूळचं मानलं जातं, जिथं त्याचा अर्थ प्रिय व्यक्ती असा होतो.
advertisement
7/7
करीना म्हणजे शुद्ध, प्रेमळ किंवा निरागस. हे नाव सौंदर्य, स्पष्टता आणि मायेचे प्रतीक मानलं जातं. करीना हे नाव कादंबरीवरून आलेलं आहे, त्यामुळे या नावाचा अर्थ साहित्यिक संदर्भातून समजला जातो. म्हणून करीना म्हणजे सुंदर, सुसंस्कृत, भावनिकदृष्ट्या मजबूत स्त्री, स्वतंत्र विचारांची, आत्मविश्वासू व्यक्ती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
एकेकाळी मुलाच्या नावामुळे ट्रोल झालेली बेबो, करीना कपूरचं नाव कसं पडलं माहितीये, नावाचा अर्थ काय?