महाराष्ट्राची क्रश, मराठी टेलिव्हिजन गाजवलं; मोठ्या पडद्यावर डेब्यू करताच अभिनेत्रीनं मिळवला मानाचा पुरस्कार
- Published by:Minal Gurav
Last Updated:
60th State Marathi Film Awards : मराठी टेलिव्हिजन गाजवणाऱ्या अभिनेत्रीनं मोठ्या पडद्यावर आपली छाप उमटवली. तिच्या कामाची दखल थेट राज्य सरकारनं घेतली.
advertisement
1/7

मराठी टेलिव्हिजनवर आपली वेगळी ओळख निर्माण करून या अभिनेत्रीनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मराठी टेलिव्हिजन गाजवल्यानंतर ही अभिनेत्री मोठ्या पडद्याकडे वळली. आणि मोठ्या पडद्यावर पदार्पणातच तिनं मानाचा पुरस्कार मिळवला.
advertisement
2/7
आपण बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. दुर्वा, फुलपाखरू, मन उडू उडू झालं यासारख्या मराठी मालिकांमधून हृतानं प्रेक्षकांची मनं जिंकली. हिट मालिकांबरोबर हृता महाराष्ट्राची क्रश झाली.
advertisement
3/7
हीच महाराष्ट्राची क्रश जेव्हा मोठ्या पडद्यावर आली तेव्हाही प्रेक्षकांनी तिला भरभरून प्रेम दिलं. अनन्या या मराठी सिनेमातून हृतानं पदार्पण केलं.
advertisement
4/7
हृताचं पदार्पण तिच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरलं. तिच्या पहिल्याच सिनेमाची दखल महाराष्ट्र शासनानं घेतली.
advertisement
5/7
हृताला उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्रीचा 60 वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार मिळाला.
advertisement
6/7
हृताबरोबरच अनन्या सिनेमाचे दिग्दर्शक प्रताप फड यांचाही प्रथम पदार्पण दिग्दर्शकासाठी 60 वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
advertisement
7/7
एका अपघतात आपले दोन्ही हात गमावलेल्या एका मुलीची सत्य कथा या सिनेमातून दाखवण्यात आली होती. अनन्या हे मुळ मराठी नाटकाच्याच नावाने अनन्या हा सिनेमा तयार करण्यात आला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
महाराष्ट्राची क्रश, मराठी टेलिव्हिजन गाजवलं; मोठ्या पडद्यावर डेब्यू करताच अभिनेत्रीनं मिळवला मानाचा पुरस्कार