आई झाली वैरीण! वडिलांनी वाऱ्यावर सोडलं, सख्खी आईच अभिनेत्रीला देणार होती विष, एका चमत्काराने बदललं जीवन
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वैष्णवीने तिच्या बालपणातील अशा काही गोष्टी उघड केल्या आहेत, ज्या ऐकून कोणाच्याही अंगावर शहारे येतील.
advertisement
1/9

९० च्या दशकातला सुपरहिरो म्हटलं की चेहऱ्यासमोर एकच चेहरा येतो, तो म्हणजे 'शक्तीमान'. या मालिकेत 'गीता विश्वास' हे पात्र साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वैष्णवी मॅकडोनाल्ड पडद्यावर जितकी लोकप्रिय ठरली, तितकंच तिचं खरं आयुष्य एखाद्या वेदनादायी चित्रपटासारखं होतं.
advertisement
2/9
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वैष्णवीने तिच्या बालपणातील अशा काही गोष्टी उघड केल्या आहेत, ज्या ऐकून कोणाच्याही अंगावर शहारे येतील. वैष्णवीचे बालपण सामान्य मुलांसारखे नव्हते. आई-वडिलांमधील टोकाच्या अहंकारामुळे आणि सततच्या भांडणांमुळे तिला कधीच स्थिर घर मिळालं नाही.
advertisement
3/9
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं, "माझे आई-वडील सतत भांडायचे, त्यामुळे आम्हाला एका हॉटेलमधून दुसऱ्या हॉटेलमध्ये राहावे लागायचे. मी अभ्यासात खूप हुशार होते, मला सायंटिस्ट व्हायचं होतं, पण या परिस्थितीमुळे माझी शाळाच सुटली."
advertisement
4/9
कुटुंब हैदराबादमध्ये स्थिरावत असतानाच अचानक वैष्णवीचे वडील कोणालाही काही न सांगता गायब झाले. कुटुंबावर आभाळ कोसळलं. पैशांची चणचण असतानाही आईने उसनवारी करून वडिलांना शोधण्यासाठी मुंबई गाठली. मुंबईतील एका स्वस्त लॉजमध्ये त्या राहायच्या, पण खिशात दमडीही उरली नव्हती.
advertisement
5/9
हताश झालेल्या आईच्या मनात तेव्हा एक अविचार आला. वैष्णवी सांगते, "माझ्या आईने स्वतःसोबत आम्हालाही मारण्याचा विचार केला होता. ती म्हणाली होती की, तुम्ही चुकीच्या हातांत पडण्यापेक्षा मी तुम्हाला विष देऊन मारून टाकेन. मी तेव्हा १६ वर्षांची होते आणि माझी बहीण १२ वर्षांची."
advertisement
6/9
त्या भयानक परिस्थितीतून वाचण्यासाठी आई त्यांना एका चर्चमध्ये घेऊन गेली. वैष्णवी सांगते की तिथे तिला एक वेगळाच अनुभव आला. पण खरा चमत्कार झाला तो लॉजवर परतल्यानंतर.
advertisement
7/9
त्यांच्या खोलीच्या दरवाजाबाहेर १०० रुपयांच्या कोऱ्या करकरीत नोटांचं एक बंडल पडलं होतं. लॉजचं बिल भरण्यासाठी जितकी रक्कम हवी होती, तितकेच पैसे तिथे होते. या अनुभवानंतर वैष्णवीचं आयुष्य बदललं. अवघ्या दोन आठवड्यांत हे कुटुंब एका व्यवस्थित घरात राहायला गेलं.
advertisement
8/9
वैष्णवीच्या आईला वाटत होतं की तिने सिनेमातच काम करावं. पण सिनेसृष्टीतील नकारात्मकतेला कंटाळून वैष्णवीने मुकेश खन्ना यांची 'शक्तीमान' मालिकेतील ऑफर स्वीकारली.
advertisement
9/9
तिची आई नाराज होती, त्यांना वाटलं की छोट्या पडद्यामुळे वैष्णवीचं करिअर संपेल. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. 'गीता विश्वास' या एका भूमिकेने वैष्णवीला जो सन्मान आणि ओळख मिळवून दिली, ती आजही अबाधित आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आई झाली वैरीण! वडिलांनी वाऱ्यावर सोडलं, सख्खी आईच अभिनेत्रीला देणार होती विष, एका चमत्काराने बदललं जीवन