मराठमोळी जिया शंकर प्रसिद्ध यूट्यूबरच्या प्रेमात? एल्विश यादवने शेअर केला क्यूट फोटो, अभिनेत्रीच्या हातात हिऱ्याची अंगठी
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Jiya Shankar-Elvish Yadav Engagement: एल्विशने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर एक असा फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे त्याचे लाखो चाहते चक्रावून गेले आहेत.
advertisement
1/10

सोशल मीडियाचा वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय स्टार एल्विश यादव पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. पण यावेळी चर्चेत कोणतं भांडण नाही, तर त्याची लव्ह लाइफ आहे! २८ वर्षीय एल्विशने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर एक असा फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे त्याचे लाखो चाहते चक्रावून गेले आहेत.
advertisement
2/10
या फोटोत त्याने ३० वर्षांच्या अभिनेत्री जिया शंकरचा हात हातात धरला असून, जियाच्या बोटात हिऱ्याची अंगठी स्पष्टपणे चमकताना दिसत आहे. एल्विशने या रोमँटिक फोटोसोबत जे कॅप्शन दिलंय, त्यानेच खऱ्या अर्थाने सोशल मीडियावर आग लावली आहे.
advertisement
3/10
एल्विशने लिहिलं आहे, "मी प्रेमाला आणखी एक संधी दिली आहे आणि मला माझं प्रेम सापडलं आहे!" सोबतच त्याने जिया शंकरच्या अकाउंटला टॅग केलं आहे.
advertisement
4/10
जियानेही वेळ न घालवता हा फोटो आपल्या स्टोरीवर शेअर करत फक्त एक लाल हार्ट इमोजी टाकला. या एका इमोजीने चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे. त्यांनी खरंच साखरपुडा केला आहे की हा एखादा पब्लिसिटी स्टंट आहे?
advertisement
5/10
जिया शंकरचं नाव याआधीही अनेकदा चर्चेत राहिलं आहे. 'बिग बॉस'मध्ये असताना तिचं आणि अभिषेक मल्हानचं नाव जोडलं गेलं होतं. पण जियाने नेहमीच या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. काही दिवसांपूर्वी तिने एका 'मिस्ट्री मॅन'सोबत फोटो शेअर करत आपल्या आयुष्यात कोणीतरी खास असल्याचं सूचित केलं होतं.
advertisement
6/10
पण तो खास माणूस एल्विश यादव असेल, असा विचार कोणाही स्वप्नात केला नव्हता. जिया नेहमीच म्हणते की तिला तिचं खाजगी आयुष्य खाजगी ठेवायला आवडतं, पण या फोटोने मात्र तिचं गुपित फोडलं आहे.
advertisement
7/10
आजकाल सेलिब्रिटींमध्ये एक नवा ट्रेंड रूजू झाला आहे. एखादा नवीन म्युझिक व्हिडिओ किंवा वेब सीरिज येणार असेल, तर अशाच प्रकारचे सस्पेन्स वाढवणारे फोटो शेअर केले जातात.
advertisement
8/10
एल्विश नुकताच 'लाफ्टर शेफ्स'मध्ये जन्नत जुबैरसोबतच्या जवळीकीमुळे चर्चेत होता. त्यातच आता जियासोबतचा हा साखरपुड्याचा फोटो समोर आल्याने, हा एखाद्या गाण्याच्या प्रमोशनचा भाग असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
advertisement
9/10
एल्विशचे चाहते सध्या द्विधा मनस्थितीत आहेत. काहींनी त्याला शुभेच्छा देणाऱ्या कमेंट्सचा पाऊस पाडला आहे, तर काहींना ही केवळ एक अफवा वाटतेय.
advertisement
10/10
जिया आणि एल्विशची ही जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र येणार की केवळ पडद्यावर, हे येणारा काळच सांगेल. पण सध्या तरी या एका अंगठीने सोशल मीडियाची सिस्टिम पूर्णपणे हँग करून टाकली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मराठमोळी जिया शंकर प्रसिद्ध यूट्यूबरच्या प्रेमात? एल्विश यादवने शेअर केला क्यूट फोटो, अभिनेत्रीच्या हातात हिऱ्याची अंगठी