'ISI-RAW एजंट एकत्र नाचत नाहीत' 'धुरंधर' फेम अभिनेत्याचा सलमान-शाहरुखवर हल्लाबोल, 'पठाण-टायगर'बद्दल म्हणाला...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dhurandhar Movie: या चित्रपटातील अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडच्या बड्या स्पाई युनिव्हर्सवर म्हणजेच पठाण आणि टायगरवर नाव न घेता निशाणा साधला आहे.
advertisement
1/8

मुंबई: २०२५ या वर्षात बॉक्स ऑफिसवर जर कोणाचं नाव गाजत असेल, तर तो चित्रपट म्हणजे 'धुरंधर'. रणवीर सिंगच्या या चित्रपटाने केवळ धुराळाच उडवला नाही, तर जगभरात १००० कोटींचा टप्पा ओलांडून इतिहास रचला आहे. पण या यशाच्या जल्लोषात आता एक नवा वाद पेटण्याची चिन्हं दिसत आहेत.
advertisement
2/8
या चित्रपटातील एक महत्त्वाचा कलाकार अंकित सागर याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडच्या बड्या स्पाई युनिव्हर्सवर म्हणजेच पठाण आणि टायगरवर नाव न घेता निशाणा साधला आहे.
advertisement
3/8
'धुरंधर'मध्ये 'जावेद खनानी'ची दमदार भूमिका साकारणारा अंकित सागर सध्या प्रचंड चर्चेत आहे. सिद्धार्थ कननला दिलेल्या एका रोखठोक मुलाखतीत अंकितने सिद्धार्थ आनंद आणि यशराज फिल्म्सच्या स्पाई चित्रपटांच्या लॉजिकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
advertisement
4/8
जेव्हा त्याला विचारण्यात आलं की, 'धुरंधर' हे यशराजच्या स्पाई युनिव्हर्सला टक्कर देऊ शकतं का? त्यावर अंकितने दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
advertisement
5/8
अंकित म्हणाला, "धुरंधरची सर्वात मोठी ताकद म्हणजे हे चित्रपट जमिनी वास्तव दाखवतो. आजकाल खूप मोठ्या आणि स्टाईलिश स्पाई फ्रँचायझी येतात, पण प्रेक्षकांना जे खरं वाटतं, ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक आयुष्यात एखादा ISI एजंट आणि RAW एजंट एकमेकांसोबत डान्स करत नाहीत! पण कदाचित त्यांनी ते केलं, कारण त्यांना व्ह्यूज हवे होते आणि पैसा कमवायचा होता."
advertisement
6/8
अंकितने जरी कोणाचं नाव घेतलं नसलं, तरी प्रेक्षकांनी याचा संबंध लगेच सलमान खानच्या 'टायगर' आणि शाहरुख खानच्या 'पठाण'शी जोडला आहे. 'पठाण'मधील 'झुमे जो पठाण' किंवा 'टायगर'च्या गाण्यांमध्ये ज्या पद्धतीने दोन्ही देशांचे गुप्तहेर एकत्र दिसले, त्यावर अंकितने हा टोला लगावला आहे. एका गुप्तहेराचं आयुष्य हे ग्लॅमरस नसून आव्हानात्मक असतं, हेच अंकितला यातून सांगायचं आहे.
advertisement
7/8
चित्रपटात अंकित सागरने साकारलेली व्यक्तिरेखा सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 'धुरंधर'च्या यशात त्याचेही मोठे योगदान मानले जात आहे. स्पाई थ्रिलरच्या नावाखाली 'मसाला फिल्म' बनवण्यापेक्षा वास्तवाच्या जवळ जाणारी कथा मांडल्यामुळेच प्रेक्षकांनी या चित्रपटाला १००० कोटींच्या क्लबमध्ये नेऊन बसवलंय, असंही त्याने ठामपणे सांगितलं.
advertisement
8/8
ज्या प्रेक्षकांना अंकितचं हे म्हणणं पटलंय आणि ज्यांना ही रियलिस्टिक क्राईम ड्रामा सिरीज आवडलीये, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे या चित्रपटाचा पुढचा भाग १९ मार्च २०२६ रोजी सिनेमागृहात धडकणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'ISI-RAW एजंट एकत्र नाचत नाहीत' 'धुरंधर' फेम अभिनेत्याचा सलमान-शाहरुखवर हल्लाबोल, 'पठाण-टायगर'बद्दल म्हणाला...